JOIN US
मराठी बातम्या / मनी / Gold price today: काय आहे 22 कॅरेट सोन्याचा भाव? पाहा मुंबईतील आजचा दर

Gold price today: काय आहे 22 कॅरेट सोन्याचा भाव? पाहा मुंबईतील आजचा दर

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मजबूत डॉलरमुळे सोन्याच्या किंमती कमी झाल्या.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 29 जून: मागील काही दिवसांपासून सोने दरात (Gold Price today) काहीशी घसरण दिसून येत आहे. आज मंगळवारी 22 कॅरेट सोन्याची 10 ग्रॅमसाठीची किंमत 46,160 रुपयांवर आहे. तर गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार चांदीचा दरही 67,900 रुपये प्रतिकिलो इतका आहे. गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार, राजधानी दिल्लीत 22 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमसाठीचा दर 46,150 इतका आहे. चेन्नईमध्ये हा दर काहीसा कमी होत 44,440 रुपये तोळा इतका आहे. तर मुंबईत 46,160 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका सोन्याचा भाव आहे. मंगळवारी 24 कॅरेट सोन्याचा दर 47,160 रुपये प्रति 10 ग्रॅमवर स्थिर आहे. तर चांदीचा दर आज 67,900 प्रतिकिलोवर स्थिर आहे. भारतीय रुपया सोमवारी व्यापार सुरू होताच अमेरिकन डॉलरच्या तुलनेत 6 पैशांनी घसरला असून तो 74.26 वर आला. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मजबूत डॉलरमुळे सोन्याच्या किंमती कमी झाल्या.

(वाचा -  कोणालाही कळणार नाही काय सर्च केलं; Google Search History साठी असा ठेवा पासवर्ड )

सोनं खरेदीबाबत काय आहे जाणकारांचं म्हणणं - जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, या वर्षाअखेरीस सोन्याचा दर मागील वर्षाचा रेकॉर्ड मोडत 60 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत पोहचू शकतो असा अंदाज आहे. परंतु या मधल्या काळात अनेक चढ-उतार पाहायला मिळू शकतात. अशात गुंतवणुकदार 6 महिन्यांच्या काळात आणि स्टॉपलॉससह नफा कमावू शकतात. सोन्यातील गुंतवणुकीबाबत बोलताना जाणकारांनी सांगितलं, की मागील वर्षापासून सोन्याने 28 टक्के रिटर्न दिले आहेत. त्या आधीच्या वर्षातही सोन्याचे रिटर्न जवळपास 25 टक्के होते. जर दिर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करत असाल, तर सोनं गुंतवणुकीसाठी अतिशय चांगला आणि सुरक्षित पर्याय आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या