नवी दिल्ली, 16 जानेवारी : केंद्रीय अर्थसंकल्प (Budget 2022-23) सादर होण्यासाठी काही दिवस शिल्लक आहेत. देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Niramala Sitaraman) 1 फेब्रुवारी 2022 रोजी आर्थिक वर्ष 2022-23 (FY23) चा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्याचबरोबर रेल्वे अर्थसंकल्पही (Railway Budget) सर्वसाधारण अर्थसंकल्पाचा भाग असेल. मोदी सरकारच्या (Modi Government) पहिल्या कार्यकाळात तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली (Arun jetley) यांनी 92 वर्षे+ जुनी प्रथा संपवत 2017 पासून रेल्वे अर्थसंकल्पाच्या घोषणा सर्वसाधारण अर्थसंकल्पातच करण्यास सुरुवात केली. यापूर्वी रेल्वेमंत्री सामान्य अर्थसंकल्पाच्या एक दिवस आधी संसदेत रेल्वे अर्थसंकल्प सादर करायचे. नीती आयोगाच्या सल्लानुसार प्रथा बंद नीती आयोगानेही सरकारला ही अनेक दशकांची जुनी प्रथा बंद करण्याचा सल्ला दिला होता. विविध प्राधिकरणांसोबत बराच विचारमंथन केल्यानंतर सरकारने रेल्वे अर्थसंकल्प सामान्य अर्थसंकल्पात विलीन करण्याचा निर्णय घेतला. केंद्रीय अर्थसंकल्पाच्या तुलनेत रेल्वे बजेटचा हिस्सा आता खूपच कमी असल्याने ही कल्पना व्यावहारिक होती. Budget 2022 : अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी सध्याचा टॅक्स स्लॅबनुसार किती टॅक्स भरावा लागतो? चेक करा डिटेल्स पहिला रेल्वे अर्थसंकल्प 1924 साली सादर भारताचा पहिला रेल्वे अर्थसंकल्प 1924 मध्ये ब्रिटिश राजवटीत सादर करण्यात आला होता. हा पहिला वेगळा रेल्वे अर्थसंकल्प होता. यापूर्वी सामान्य अर्थसंकल्पासोबतच रेल्वे अर्थसंकल्पही सादर केला जात होता. 1920-21 मध्ये, एकवर्थ समितीने रेल्वे अर्थसंकल्पावर आपला अहवाल सादर केला, ज्यामध्ये असे म्हटले होते की रेल्वे अर्थसंकल्प स्वतंत्रपणे सादर केला जावा आणि त्याच्या आर्थिक बाबी स्वतंत्रपणे पाहिल्या जातील. Budget 2022: अर्थसंकल्पात येणाऱ्या या शब्दांचा अर्थ तुम्हाला माहितेय का? सोप्या भाषेत घ्या समजून संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारीपासून सुरू होणार संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारी रोजी दोन्ही सभागृहात राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने सुरू होईल आणि 8 एप्रिल रोजी संपेल. वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, संसदीय कामकाजावरील कॅबिनेट समितीच्या शिफारशीचा हवाला देत सूत्रांनी ही माहिती दिली आहे. 1 फेब्रुवारी 2022 रोजी देशासमोर सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर होणार आहे. सत्राचा पहिला भाग 11 फेब्रुवारीला संपणार आहे. एक महिन्याच्या विश्रांतीनंतर, सत्राचा दुसरा भाग 14 मार्चपासून सुरू होईल आणि 8 एप्रिल रोजी संपेल.