JOIN US
मराठी बातम्या / मनी / हा तर अन्याय! अमेरिकेपेक्षा भारतीयांना Blue tick साठी मोजावे लागणार जास्त पैसे

हा तर अन्याय! अमेरिकेपेक्षा भारतीयांना Blue tick साठी मोजावे लागणार जास्त पैसे

Blue tick बाबात समोर आली मोठी माहिती, पाहा तुम्हाला किती द्यावे लागणार पैसे

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई: तुमच्याकडे ट्विटरचं ब्लू टिक असेल किंवा तुम्ही घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. भारतात ब्लू टिकचे दर हे अमेरिकेपेक्षा जास्त असू शकतात. भारतीय नागरिकांना महिन्याला किती रुपये मोजावे लागणार याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता मोठा वाद सोशल मीडियावर सुरू झाला आहे. ट्विटरसोबतचा करार यशस्वी झाला आणि एलन मस्क यांच्याकडे सगळी सूत्र आली. एलन मस्क यांनी गेल्या काही दिवसात ट्विटरमध्ये अनेक बदल केले. आर्थिक मंदी आणि होणाऱ्या खर्चांमध्ये कपात करण्यासाठी 50 टक्क्यांपर्यंत कर्मचारी देखील कामावरून काढले आहेत. एलन मस्क यांचा ट्विटर खासगी करायचा प्लॅन आहे. याआधी ब्लू टिकसाठी कोणतेही पैसे मोजावे लागत नव्हते. एलन मस्क यांनी ट्विटरसोबत करार केल्यानंतर ट्विटरच्या ब्लू टिकसाठी पैसे मोजावे लागणार असल्याचं सांगण्यात आलं. भारतासाठी अमेरिकेपेक्षा जास्त पैसे मोजावे लागू शकतात.

गर्भवती असताना ट्विटर कंपनीसाठी घेतले अहोरात्र कष्ट; आता कामावरून काढून टाकल्यामुळे सुजाताला देश सोडावा लागणार?

अमेरिका आणि इतर देशांमध्ये महिन्याला 7.99 डॉलर ब्लू टिकसाठी मोजावे लागत आहेत. तर भारतात ब्लू टिकसाठी 719 रुपये मोजावे लागू शकतात. एक गोष्ट झाली की फीचर रिलीज करताना कंपनी त्यात बदल करू शकते. रिपोर्टनुसार, भारतात अनेक लोकांना हे फीचर मिळत आहे. त्यामध्ये ट्विटर ब्लू सबस्क्रिप्शन चार्ज 719 रुपये असण्याची शक्यता आहे. सध्या ही सेवा आयफोन युजर्ससाठी सुरू करण्यात आली आहे. आता जे युजर्स अँड्रॉइड वापरतात त्यांना किती रुपये मोजावे लागणार? त्यांच्यासाठी ही सेवा कधीपासून लागू होणार असे अनेक प्रश्न आहेत. मात्र अजून यापैकी कोणत्याही प्रश्नाचं उत्तर मिळू शकलं नाही. त्यामुळे अँड्रॉइड युजर्सना यासाठी थोडी वाट पाहावी लागू शकते.

ट्विटर डिलनंतर एलन मस्क यांना दुसरा दणका, शेअर्स विकण्याची आली वेळ?

संबंधित बातम्या

ज्या युजर्सकडे आधीच ब्लू टिक आहे त्यांना पैसे भरायचे नसतील तर त्यांनी काय करायचं याबाबतही लवकरच माहिती समोर येऊ शकते. ट्विटरच्या या बदलेल्या नियमांमुळे लोक आता ट्विटरसोडून पर्यायी अॅपकडे वळत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या