नवी दिल्ली, 21 जानेवारी: कोणत्याही पारंपरिक बचत योजनेत गुंतवणूक करून एखादी व्यक्ती कोट्याधीश होऊ शकते का, असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का? ढोबळमानाने विचार केला तर ही गोष्ट तुम्हाला अशक्य वाटेल. पण, एका सरकारी योजनेच्या मदतीनं कोट्याधीश होण्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. पब्लिक प्रॉव्हिडंट फंड म्हणजेच पीपीएफ असं या योजनेचं नाव आहे. पीपीएफ ही दीर्घ मुदतीची आणि मोठ्या प्रमाणात रिटर्न्स मिळवून देणारी मोठी गुंतवणूक योजना आहे. दीर्घकालीन व्याज मिळवण्यासाठी गुंतवणूकदार पीपीएफचा वापर करतात. ही एक उच्च व्याजदर देणारी सरकारी योजना आहे, त्यामुळे त्यात जोखीमदेखील जास्त नाही. प्रत्येक आर्थिक वर्षाच्या शेवटी पीपीएफ गुंतवणुकीच्या रकमेवरील व्याज खात्यात जमा केलं जातं. सध्या या योजनेत 7.10 टक्के दरानं व्याज मिळत आहे. पीपीएफवरील व्याज दर तिमाहीनंतर बदलतात. एका आर्थिक वर्षात पीपीएफ योजनेत किमान 500 रुपये आणि कमाल 1.5 लाख रुपये जमा करता येतात. Life insurance घेताना करु नका चुका, अन्यथा…
समजा, तुम्ही पीपीएफमध्ये एका वर्षात एक लाख 50 हजार रुपये असे 25 वर्षं गुंतवले. व्याज दर 7.1 टक्के असेल तर या संपूर्ण कालावधीत तुम्ही 37 लाख 50 हजार रुपयांची गुंतवणूक कराल. तुम्ही केलेल्या गुंतवणुकीवर 65 लाख 58 हजार 15 रुपये व्याज मिळेल. जर मुद्दल आणि व्याजाची रक्कम जोडली तर ती एक कोटी तीन लाख आठ हजार 15 रुपये होते. म्हणजे या योजनेद्वारे दरमहा 12 हजार 500 रुपये जमा करून तुम्ही 25 वर्षांत कोट्याधीश होऊ शकता. या रिटर्नमध्ये बदलत्या व्याजदरानुसार बदल होऊ शकतात. ATM कार्ड नसले तरी तुम्ही करु शकता UPI अॅक्टिवेशन, ही आहे सोपी पद्धत
पीपीएफ खातेधारक टॅक्स फ्री व्याज मिळवू शकतात. जेव्हा तुम्ही या योजनेच्या 15व्या वर्षात किंवा नंतर पैसे काढता तेव्हा तुम्हाला टॅक्स फ्री रिटर्न्स मिळतात. पगारदार कर्मचारी आयकर कायदा, 1961 च्या कलम 80C अंतर्गत या कर सवलतीसाठी दावा करू शकतात. पोस्ट ऑफिस किंवा बँकेत पीएफएफ खाती उघडता येतात. पीपीएफ खात्यामध्ये, खातेदाराला योजनेच्या पाच वर्षानंतर खाते उघडण्याचं वर्ष वगळून एका आर्थिक वर्षात एकदा पैसे काढण्याची परवानगी आहे. या योजनेचा लॉक-इन कालावधी 15 वर्षांचा असतो.
या योजनेमध्ये खातेदार मुदतपूर्तीपूर्वी काही प्रमाणात पैसे काढू शकतात. योजनेच्या सातव्या वर्षापासून अंशत: पैसे काढण्याची परवानगी आहे. 15 वर्षानंतर पूर्ण रक्कम काढता येऊ शकते. पीपीएफचा मॅच्युरिटी कालावधी 15 वर्षांचा आहे. पण, गुंतवणूकदाराच्या इच्छेनुसार तो प्रत्येकी पाच वर्षांपर्यंत दोनदा वाढवता येऊ शकतो.