JOIN US
मराठी बातम्या / मनी / Tata च्या शेअरची कमाल, दोन वर्षात 1000 टक्के रिटर्न; तुमच्याकडे आहे का 'हा' शेअर?

Tata च्या शेअरची कमाल, दोन वर्षात 1000 टक्के रिटर्न; तुमच्याकडे आहे का 'हा' शेअर?

Tata Elxsi चे शेअर्स 27 मार्च 2020 रोजी 639.10 रुपयांवर होते. 9 मार्च 2022 च्या बंद किंमतीनुसार, त्याचे शेअर्स 7045 रुपयांवर बंद झाले आहेत. या दोन वर्षांत, टाटा समूहाच्या या आयटी स्टॉकने गुंतवणूकदारांना 1000 टक्क्यांचा उत्कृष्ट परतावा दिला आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 10 मार्च : गेल्या काही आठवड्यांत शेअर बाजारात खळबळ उडाली होती, मात्र असे असतानाही या काळात काही शेअर्स मल्टीबॅगर ठरले आहेत. असाच एक शेअर म्हणजे टाटा समूहाचा TATA Elxsi शेअर आहे. हा आयटी क्षेत्रातील मल्टीबॅगर स्टॉकपैकी एक आहे. गेल्या दोन वर्षांत या सॉफ्टवेअर कंपनीच्या शेअरची किंमत 639 रुपयांवरून 7045 रुपयांपर्यंत वाढली आहे. म्हणजेच कंपनीच्या शेअर्सनी या कालावधीत 11 पट परतावा दिला आहे. Tata Elxsi ची प्राईज हिस्ट्री गेल्या एका महिन्यात Tata Elxsi च्या शेअरची किंमत 7603.60 रुपयांवरून 7045 रुपयांपर्यंत घसरली आहे. म्हणजेच या कालावधीत त्यात 8 टक्क्यांनी घट झाली आहे. गेल्या 6 महिन्यांत हा मल्टीबॅगर शेअर 5009.30 रुपयांवरून 7045 रुपयांपर्यंत वाढला आहे. म्हणजेच या कालावधीत गुंतवणूकदारांना 40 टक्के परतावा मिळाला. Home Loan वर 1 एप्रिलपासून ‘ही’ टॅक्स सूट नाही मिळणार जर आपण या वर्षाच्या आतापर्यंतच्या परताव्याबद्दल बोललो तर, Tata Elxsi ने 20 टक्के परतावा दिला आहे. या दरम्यान त्याचे शेअर्स 5893.65 रुपयांवरून 7045 रुपयांपर्यंत वाढले. गेल्या एक वर्षाच्या चार्टवर नजर टाकली तर Tata Elxsi च्या शेअरची किंमत 2696.55 रुपयांवरून 7045 रुपयांपर्यंत वाढली आहे. या कालावधीत गुंतवणूकदारांना 160 टक्के परतावा मिळाला आहे. Tata Elxsi चे शेअर्स 27 मार्च 2020 रोजी 639.10 रुपयांवर होते. 9 मार्च 2022 च्या बंद किंमतीनुसार, त्याचे शेअर्स 7045 रुपयांवर बंद झाले आहेत. या दोन वर्षांत, टाटा समूहाच्या या आयटी स्टॉकने गुंतवणूकदारांना 1000 टक्क्यांचा उत्कृष्ट परतावा दिला आहे. तुम्हीही Paytm चे शेअर्स घेतले का? तीन महिन्यात एका लाखाचे झाले 35 हजार, आता ही चूक करू नका गुंतवणूकदारांना कसा नफा झाला? जर तुम्ही दोन वर्षांपूर्वी Tata Elxsi शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 11 लाख रुपये झाले असते. जर तुम्ही 1 वर्षापूर्वी त्यात 1 लाख रुपये ठेवले असते तर तुमचे रिटर्न 2.60 लाख रुपये झाले असते. ज्यामध्ये 6 महिन्यांत तुमचे 1 लाख रुपये 1.40 लाख झाले असते. शेअरच्या किमतीची पुढची चाल कशी असेल? गेल्या दोन वर्षांत Tata Elxsi चा चांगला परतावा असूनही, बाजारातील तज्ज्ञ त्यावर उत्साही आहेत. येत्या काही दिवसांत त्याचे शेअर्स आणखी वाढू शकतात, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. चॉईस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमीत बगाडिया म्हणाले, हा मल्टीबॅगर आयटी स्टॉक्स तेजीच्या टप्प्यात आहेत. त्याच्या लाईफटाईम हायवरून शेअर घसरल्यानंतर, त्याचे शेअर्स पुन्हा उसळी घेऊ शकतात. अल्प मुदतीसाठी गुंतवणूकदार 7250-7400 रुपयांच्या टार्गेटसह शेअर खरेदी करू शकतात. यासाठी 6800 रुपयांवर स्टॉप लॉस ठेवण्यास विसरू नका. जर शेअरने 6800 ची पातळी ओलांडला तर तुम्ही आणखी खरेदी करू शकता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या