JOIN US
मराठी बातम्या / मनी / मुलीचं भविष्य करा सुरक्षित, 'या' सरकारी स्कीममध्ये 250 रुपयांपासून करा गुंतवणूक

मुलीचं भविष्य करा सुरक्षित, 'या' सरकारी स्कीममध्ये 250 रुपयांपासून करा गुंतवणूक

टॅक्समध्येही सूट आणि फक्त 250 रुपयांपासून सरकारी योजनेत गुंतवणूक, तुम्हाला माहिती आहे का ‘ही’ स्कीम

जाहिरात

मुलीचं भविष्य करा सुरक्षित, 250 रुपयांपासून करा गुंतवणूक

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई : मुलीचं लग्न असो किंवा शिक्षण त्यासाठी भरपूर पैसे लागतात. त्यामुळे पुढे कसं करायचा हा एक मोठा प्रश्नच असतो. मुलगी ओझं वाटू नये आणि तिच्या शिक्षणाचा आणि लग्नाचा खर्च सुटावा यासाठी सरकारने खास योजना 2014 पासून सुरू केली आहे. ही योजना मोदी सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना मानली जाते. मुलीच्या नावाने तुम्ही 250 रुपये या योजनेत गुंतवू शकता. कमीत कमी तेवढे आणि जास्ती तुम्हाला हवे तेवढे पैसे गुंतवता येतात. या स्कीमवर सरकार 7.1 टक्के व्याज देखील देते. याशिवाय सरकारने या योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांना टॅक्समध्ये सूटही दिली आहे. या योजनेचा मूळ उद्देश मुलगी वाचवणं आणि त्यांना सुशिक्षित करून स्वत:च्या पायावर उभं करणं हा आहे. बँक ऑफ महाराष्ट्र च्या सर्व शाखांमध्ये खाते उघडता येते. मुलींच्या कल्याणासाठी प्रोत्साहन देणे हा यामागचा हेतू आहे. कायदेशीर पालक मुलीच्या जन्मापासून ते दहा वर्षांचे होईपर्यंत मुलीच्या नावे खाते उघडू शकतात.

पर्सनल लोन घेणं फायद्याचं की तोट्याचं? समजून घ्या सोप्या शब्दात

दोन मुली किंवा तीन पर्यंत जुळ्या मुलींचा दुसरा जन्म किंवा पहिल्या जन्माचा परिणाम तीन मुलींमध्ये होतो. शंभर रुपयांच्या एकाधिक ठेवीसह पहिल्यांदा 250 रक्कम त्यानंतर आर्थिक वर्षात रु 150000 आहे.

‘ही’ बँक देतेय सर्वांत स्वस्त एज्युकेशन लोन, जाणून घ्या सविस्तर

खातं उघडल्यापासून 21 वर्षांपर्यंत हे पैसे गुंतवता येतात. त्यानंतर ही रक्कम मुलीला मिळते. 15 वर्ष झाल्यानंतर ठरावीक रक्कम काढण्याची मुभा देण्यात आली आहे. मागील शैक्षणिक वर्षाच्या अखेरीस खात्यात बाकी असलेली 50% शिल्लक उच्च शिक्षणाच्या उद्देशाने, वयाच्या 18 वर्षानंतर विवाह या उद्देशाने काढण्याची मुभा देण्यात आली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या