मुंबई: बँक ऑफ महाराष्ट्र ग्राहकांसाठी वेगवेगळ्या सेवा आणत असते. ग्राहकांना Whatsapp सेवा देखील सुरु केली आहे. ज्याद्वारे बँकेतील गर्दी कमी होऊन ग्राहकांना घरबसल्या स्टेटमेंट घेता येतं. त्यामुळे बँकेच्या फेऱ्या वाचतील. आता बँकेनं आणखी एक सुविधा सुरू केली आहे.
बँक ऑफ महाराष्ट्रने डोअर स्टेप सेवा सुरू केली आहे. यासंदर्भात ट्वीट करून माहिती दिली आहे. या डोअर स्टेप सेवेचा लाभ घेता येणार आहे. यामध्ये 10 हजार रुपयांपर्यंत घरपोहोच पैसे देखील ग्राहकांना इमरजन्सीच्या काळात मिळू शकतात.
अशी सेवा ऑफिसने सुरू केली होती आता काही ग्रामीण भागांमध्ये अजूनही ही सेवा सुरू आहे. आता बँक ऑफ महाराष्ट्रने आता डोअर स्टेप सेवा सुरू केली आहे. या अंतर्गत ग्राहकांना अकाउंट स्टेटमेंट, टर्म डिपॉझिट अॅक्टिव्ह करणं, TDS, फॉर्म 16 सेवा, चेकबुक आणि 10 हजार रुपये घरपोहोच या सेवांचा लाभ घेता येणार आहे.
बँकिंग हे इतके सोयीस्कर, सुरक्षित आणि वेळेची बचत करणारे कधीच नव्हते, हे सर्व एकाच वेळी झाले आहे. आम्ही आपल्या दारात आपल्या बँकिंग गरजा पूर्ण करण्यासाठी फक्त एक कॉल दूर आहोत. Door Step Banking सेवांचा लाभ घ्या असं आवाहन ग्राहकांना केलं आहे.
Banking has never been this convenient, secure &time-saving, all at once. We are just a call away to meet your banking needs at your doorstep. Avail #BankofMaharashtra #DoorStepBanking Services.
Click to know more: https://t.co/Egl9qh6wbm#mahabank #AmritMahotsav #PSBAlliance pic.twitter.com/EOMA2Kf5ce — Bank of Maharashtra (@mahabank) December 8, 2022
तर दुसरीकडे ग्राहक चेकबुकसाठीची स्लीप, GST चलन चेकसोबत, 15G फॉर्म, अशा काही गोष्टी बँकेच्या कर्मचाऱ्याकडे बँकेत जमा करण्यासाठी देऊ शकतात. याशिवाय लाईफ सर्टिफिकेट देखील तुम्हाला जमा करता येणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bank Of Maharashtra