JOIN US
मराठी बातम्या / मनी / दिवाळीआधी शेअर बाजारात मोठी उसळी, अवघ्या काही मिनिटांत गुंतवणूकदारांनी कमवले 2 लाख कोटी

दिवाळीआधी शेअर बाजारात मोठी उसळी, अवघ्या काही मिनिटांत गुंतवणूकदारांनी कमवले 2 लाख कोटी

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी BSEचे 30 शेअर असलेला प्रमुख इंडेक्स सेन्सेक्स 650 अंकांनी वाढून 42 हजार 543च्या नव्या शिखरावर पोहोचला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 09 नोव्हेंबर : अमेरिकेत जो बायडन यांनी राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक जिंकल्यानंतर आज भारतीय बाजारपेठेत मोठी उसळी पाहायला मिळाली. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी BSEचे 30 शेअर असलेला प्रमुख इंडेक्स सेन्सेक्स 650 अंकांनी वाढून 42 हजार 543च्या नव्या शिखरावर पोहोचला आहे. त्याचबरोबर NSEचा 50 शेअर असलेला इंडेक्स निफ्टीही 12 हजार 430 वर पोहचला आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, अमेरिकेतील निवडणुकांनंतर बाजारपेठेत मोठी भरभराट झाली आहे. त्याचा परिणाम जगभरातील सेन्सेक्सवर दिसत आहे. आज बाजारात आलेल्या तेजीनंतर गुंतवणूकदारांनी काही मिनिटांत 2 लाख कोटी रुपयांची कमाई केली आहे. सोमवारी बाजार उघडल्यानंतर BSE लिस्टेड कंपन्यांची मार्केट कॅप 1,65,45,013.79 कोटी रुपयांवर पोहोचली. त्याचबरोबर बाजारपेठ शुक्रवारी 1,63,60,699.17 कोटी रुपयांवर बंद झाली. वाचा- फक्त 5,177 रुपयांत खरेदी करा सोनं, आजपासून घ्या ‘या’ योजनेचा फायदा

संबंधित बातम्या

वाचा- कमी जोखीम आणि चांगला रिटर्न देणारी पोस्टाची योजना! जाणून घ्या कसे मिळतील 16 लाख तेजी वाले 30 स्टॉक्स आज सेन्सेक्सचे 30 स्टॉक्स ग्रीन मार्कमध्ये व्यापार करीत आहेत. ICICI Bank 3.90 टक्के वाढीसह अव्वल स्थानी आहे. याशिवाय अलावा Bharti Airtel, Axis Bank, Bajaj Finance, Power Grid, Infosys, HDFC Bank, Bajaj Finance, Kotak Bank, HUL, Tech Mahindra, Tata Steel, NTPC, HDFC, LT, SBI, TCS, ONGC हे सर्व ग्रीन मार्कमध्ये व्यवसाय करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या