जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Sovereign Gold Bond Scheme : फक्त 5,177 रुपयांत खरेदी करा सोनं, आजपासून घ्या 'या' योजनेचा फायदा

Sovereign Gold Bond Scheme : फक्त 5,177 रुपयांत खरेदी करा सोनं, आजपासून घ्या 'या' योजनेचा फायदा

धनत्रयोदशीच्या काही दिवस आधीच सोन्याचे भाव वधारले आहेत. नोव्हेंबर महिन्यात आतापर्यंत सोन्याचा भाव 1633 रुपयांनी वाढला आहे. चांदीचे भावही या महिन्यात वाढले आहेत. चांदीच्या दरात 5919 रुपये प्रति किलोग्रम वाढ झाली आहे.

धनत्रयोदशीच्या काही दिवस आधीच सोन्याचे भाव वधारले आहेत. नोव्हेंबर महिन्यात आतापर्यंत सोन्याचा भाव 1633 रुपयांनी वाढला आहे. चांदीचे भावही या महिन्यात वाढले आहेत. चांदीच्या दरात 5919 रुपये प्रति किलोग्रम वाढ झाली आहे.

दिवाळीआधी स्वस्त सोने खरेदी करण्याची सुवर्णसंधी! अजिबात मिस करू नका ही योजना.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 09 नोव्हेंबर : यंदा दिवाळीआधी (Diwali 2020) केंद्र सरकार तुम्हाला स्वस्त दरात सोनं खरेदी करण्याची संधी देत आहे. आजपासून तुम्ही सॉव्हरेन गोल्ड बाँड (Sovereign Gold Bond Scheme) मध्ये गुंतवणूक करू शकता. रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने (RBI) सॉव्हरेन गोल्ड बाँडची आठवी सीरिज सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी RBIने सोन्याचा दर 5,177 रुपये प्रति ग्रॅम निश्चित केला आहे. मुख्य म्हणजे ही गुंतवणूक सरकारच्या वतीनं जारी करण्यात आल्यामुळे अतिशय सुरक्षित आहे. स्वस्त दरात सोनं खरेदी करण्यासाठी तुमच्याकडे 9 ते 13 नोव्हेंबरपर्यंतची संधी आहे. याची सेटलमेंट तारिख 18 नोव्हेंबर आहे. SGB साठी ऑनलाइन अर्ज केल्यानंतर आणि डिजिटल माध्यमातून पैसे भरल्यानंतर प्रति ग्रॅम 50 रुपयांची सवलत देखील देण्यात येईल. डिजिटल पेमेंट करणाऱ्यांसाठी ही किंमत 5127 रुपये असेल. याआधीच्या 12 ऑक्टोबर रोजी जारी करण्यात आलेल्या गोल्ड बाँडची किंमत प्रति ग्रॅम 5,051 रुपये होती. अशी ठरते किंमत सरकारकडून आरबीआयच्या माध्यमातून हे गोल्ड बाँड जारी केले जातात. या योजनेचा मुख्य उद्देश सोन्याची फिजिकल मागणी कमी करणे हा आहे, जेणेकरून सोन्याची आयात कमी केली जाईल. 2015 मध्ये ही योजना सुरू करण्यात आली होती. आरबीआयने अशी माहिती दिली आहे की, भारत बुलियन अँड असोसिएशन लिमिटेडकडून गोल्ड बाँड जारी करण्याच्या आधीच्या आठवड्यातील शेवटच्या 3 व्यवहाराच्या दिवसात 999 शुद्धतेच्या सोन्याच्या किंमतीच्या आधारे या बाँडच्या किंमती ठरतात. किती करता येईल गुंतवणूक? सॉव्हरेन गोल्ड बाँडमध्ये वैयक्तिक स्वरुपात कमीत कमी 1 ग्रॅम तर जास्तीत जास्त 4 किलो सोन्याची गुंतवणूक करता येते. या बाँडच्या मॅच्यूरिटीचा कालावधी 8 वर्षांचा असतो. मात्र यामध्ये गुंतवणुकीनंतर पाचव्या वर्षी स्कीममधून बाहेर पडण्याचा देखील पर्याय असतो. Sovereign Gold Bond ची विक्री बँक, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, निवडण्यात आलेले पोस्ट आणि एनएसई तसच बीएसईच्या माध्यमातून होते. यातील कोणत्याही ठिकाणी जाऊन तुम्ही बाँड योजनेमध्ये सामील होऊ शकता. वार्षिक किती व्याज मिळेल सॉव्हरेन गोल्ड बाँडमध्ये 2.5 टक्क्यांचे व्याज मिळते. गोल्ड बाँडमध्ये महत्त्वाची बाब म्हणजे याच्या स्टोअरेजची चिंता करावी लागत नाही. डिमॅटमध्ये ठेवल्यास याकरता कोणताही जीएसटी द्यावा लागत नाही. जर गोल्ड बाँडच्या मॅच्यूरिटीवर कोणताही कॅपिटल गेन्स बनला तर यावर सूट मिळते. गोल्ड बाँडवर हा एक्सक्लूझिव्ह लाभ मिळतो. कुणाला करता येईल गुंतवणूक? सॉव्हरेन गोल्ड बाँडमध्ये ती प्रत्येक व्यक्ती गुंतवणूक करू शकते जी भारतात वास्तव्य करते. तुम्ही तुमच्यासाठी किंवा दुसऱ्या एखाद्या व्यक्तीबरोबर संयुक्त पद्धतीने याची खरेदी करू शकता. अल्पवलीन मुलांच्या नावे देखील गोल्ड बाँड खरेदी केले जाऊ शकतात. यात एक विद्यापीठ, धर्मादाय संस्था किंवा ट्रस्ट बॉन्ड धारक असू शकतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात