JOIN US
मराठी बातम्या / मनी / केवळ 15000 रुपयांत सुरू करा तुळशीची शेती; 3 लाखांपर्यंत होईल कमाई

केवळ 15000 रुपयांत सुरू करा तुळशीची शेती; 3 लाखांपर्यंत होईल कमाई

तुळशीच्या (Tulsi) शेतीतून कोणीही भरघोस कमाई करू शकतं. जाणून घ्या तुळशीच्या (Basil) शेतीतून कशी करता येईल मोठी कमाई…

जाहिरात

सगळ्यांच्या घरी तुळस लावलेली असते. तुळशीमध्ये औषधी गुणधर्म आहेत. तुळशीची पानं खाल्ल्यामुळे डायबेटीज, कॅन्सर, रेस्पिरेटरी डिसॉर्डर, क्रॉनिक फिव्हर यामध्ये फायदा होतो.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 29 मार्च : जर तुम्ही शेतीमधून कमाई करण्याचा विचार करत आहात, तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. या शेतीतून लाखो रुपयांची कमाई करता येऊ शकते आणि हा व्यवसाय सुरू करण्यासाठी पैशांची गुंतवणूकही कमी करावी लागते. तुळशीच्या (Tulsi) शेतीतून कोणीही भरघोस कमाई करू शकतं. जाणून घ्या तुळशीच्या (Basil) शेतीतून कशी करता येईल मोठी कमाई… तुळशीची शेती करण्यासाठी अधिक गुंतवणुकीची गरज नाही. त्याशिवाय तुळशीची मागणीही मोठ्या प्रमाणात आहे. प्रत्येत घरात तुळशीचं रोपटं असतंच. तसंच, याचा वापर औषधांमध्ये, पूजेसाठीही आणि इतरही गोष्टींमध्ये केला जातो. कोरोना संकटात मागणी वाढली - कोरोना काळात देशभरात लोकांचा आयुर्वेदिक आणि नॅच्युरल औषधांकडे कल वाढला आहे. त्यामुळे याची मागणीही मोठ्या प्रमाणात आहे. सध्या तुळशीचा बाजारही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अशात औषधीय झाडांचा, औषधीय रोपटी लावण्याचा व्यवसाय सुरू केल्यास, फायदेशीर ठरू शकतो.

(वाचा -  हा व्यवसाय करून अवघ्या 4 महिन्यात कमवा 8 लाख रुपये; सरकारही करेल मदत )

हा व्यवसाय सुरू करण्यासाठी भल्यामोठ्या रकमेसह, मोठ्या जागेचीही गरज लागत नाही. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगद्वारेही हा व्यवसाय सुरू करता येतो.

(वाचा -  CNG पंप सुरू करुन करा बक्कळ कमाई; ही सरकारी कंपनी देतेय संधी, असा करा अर्ज )

तुळशीची शेती सुरू करण्यासाठी सुरुवातीला 15000 रुपये खर्च करावे लागतील. पेरणीनंतर 3 महिन्यांनी तुळशीचं पीक सरासरी 3 लाख रुपयांना विकलं जातं. बाजारात उपलब्ध असलेल्या अनेक आयुर्वेदिक कंपन्या डाबर, वैद्यनाथ, पतंजली अशा अनेक कंपन्या तुळशीची कॉन्ट्रॅक्टवर शेती करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या