मुंबई : रुपयाने पुन्हा एकदा रेकॉर्ड मोडला आहे. गेल्या काही आठवड्यांपासून रुपयाचं मूल्य नीचांकी पातळीवर आहे. उच्चांकी पातळीवर पोहोचण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याचा मोठा परिणाम आशियातील मार्केटवर आज पाहायला मिळू शकतो. आंतरराष्ट्रीय स्तरावर मंदीचं संकट आहे. US फेड बँकेनं महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी ०.७५ टक्के व्याजरात वाढ केली होती. आता पुन्हा एकदा मंदीचं संकट असल्याने व्याजदरात वाढ केली जाण्याची शक्यता आहे. गेल्या आठवड्यातील स्थिती गेल्या आठवड्यात BSE सेन्सेक्स 30.81 अंकांनी घसरून 58,191.29 वर बंद झाला, तर निफ्टी 17.10 अंकांनी घसरून 17314.70 वर बंद झाला. निफ्टी बँकेबद्दल बोलायचे झाले तर तो 104.70 अंकांनी घसरला आणि तो 39,178.10 वर बंद झाला. सुरुवातीच्या आठवड्यात बाजारात घसरण दिसून येईल, पण आठवड्याच्या अखेरीस त्यातही उसळी दिसेल, असे तज्ज्ञांचे मत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठ कोसळण्याचं कारण रशिया युक्रेन युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अत्यंत वाईट स्थिती आहे. त्याचा मोठा परिणाम आशियातील मार्केटवर सोमावरी सकाळी पाहायला मिळू शकतो. अमेरिकेतील बेरोजगारीच्या अलीकडच्या आकडेवारीचा परिणाम जगभरातील देशांवर दिसून आला. चांदीचे दागिने आणि कॉइनवरही हॉलमार्किंग आवश्यक? काय आहे नियम महागाईच्या झळा तीव्र कच्चा तेलाच्या किंमती, सोनं या सगळ्याच गोष्टी महाग झाल्या आहेत. परिणामी सर्वसामान्य नागरिकांना ऐन सणासुदीच्या काळात खिशाला मोठी कात्री लागण्याची शक्यता आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेची काय स्थिती अमेरिका आणि युरोपमधील आर्थिक मंदीच्या भीतीने जागतिक बाजारातील घसरण कायम राहिली. युरोपच्या प्रमुख स्टॉक मार्केटमधील जर्मनीचे स्टॉक एक्स्चेंज DAX 1.59 टक्क्यांनी घसरले आहेत. तर फ्रान्सचे स्टॉक मार्केट CAC 1.17 टक्क्यांनी घसरले. Business Idea: अत्यंत कमी भांडवलात सुरू करा बिझनेस; दर महिन्याला लाखोंमध्ये होईल कमाई!
याशिवाय लंडनचा स्टॉक एक्सचेंज एफटीएसई 0.09 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाला. आशियातील बाजारपेठ सोमवारी उघडताना दिलासादायक नसेल अशी चिन्हं एकूण स्थिती पाहता वाटत आहे. आज बाजारपेठेत काय स्थिती राहिल याकडे गुंतवणूकदारांचं लक्ष लागलं आहे. हा काळ गुंतवणूकदारांसाठी कठीण आणि जोखमीचा आहे.