JOIN US
मराठी बातम्या / मनी / Tata चा 'पॉवर'फुल शेअर! गुंतवणूकदारांची 15 दिवस आधीच दिवाळी

Tata चा 'पॉवर'फुल शेअर! गुंतवणूकदारांची 15 दिवस आधीच दिवाळी

टाटा पॉवरच्या शेअरची किंमत 20 सप्टेंबर रोजी 134.30 रुपये होती. जी आज 109 रुपयांनी वाढून 244 रुपयांपर्यंत पोहोचली आहे. म्हणजे जवळपास 81 टक्क्यांचे रिटर्न्स या शेअरने गुंतवणूकदारांना दिले आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 19 ऑक्टोबर : टाटा देशातील मोठा आणि विश्वासार्ह उद्योग समूह आहे. टाटा उद्योग समूहाच्या (Tata Group) अनेक कंपन्यांचे स्टॉक्स शेअर बाजारामध्ये लिस्टेड आहेत. सध्या टाटाचे जवळपास सर्वच शेअर्स तेजीत असून गुंतवणूदारांना मोठ्या प्रमाणात रिटर्न्स दिले आहेत. त्यातील एक कंपनी म्हणजे टाटा पॉवर (Tata Power share price). आज टाटा पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये काही प्रमाणात पडझड झालेली पाहायला मिळाली. मात्र गेल्या महिनाभरातील टाटा पॉवर कंपनीच्या शेअर्सचा चढता आलेख पाहिला तर आजची पडझड होण्याआधीच अनेकांनी प्रॉफिट बुक केलं असेल हे नक्की. टाटा पॉवरचे शेअर आज जवळपास साडेपाच टक्क्यांनी म्हणजे जवळपास 14 रुपयांनी कोसळले. मात्र टाटा पॉवर शेअरच्या महिनाभरातील कामगिरीवर एक नजर टाकली तर गुंतवणूकदारांना दिवाळीचा बोनस आधीच मिळाला आहे. कारण जवळपास 81 टक्क्यांचे रिटर्न या शेअरने गेल्या महिनाभरात दिले आहेत. काल परवा पर्यंत हे 95 टक्क्यांपर्यंत होते. महिनाभरात शेअरच्या किमतीत 81 टक्क्यांची वाढ गेल्या महिन्यात 20 सप्टेंबर रोजी टाटा पॉवरच्या शेअरची किंमत 134.30 रुपये होती. जी आज 109 रुपयांनी वाढून 244 रुपयांपर्यंत पोहोचली आहे. म्हणजे जवळपास 81 टक्क्यांचे रिटर्न्स या शेअरने गुंतवणूकदारांना दिले आहे. साध्या सोप्या भाषेत सांगायचं तर बँकेचे एखादी रक्कम तुम्ही फिक्स डिपॉझिट म्हणून टाकली तर ती दुप्पट व्हायला किमान 12 वर्षांचा कालावधी तरी लागला असता. मात्र तीच रक्कम तुम्ही टाटा पॉवर शेअरमध्ये गेल्या महिन्यात गुंतवली असती तर तुम्हाला 12 वर्ष वाट पाहावी लागली नसती. Radhakishan Damani कमी करतायंत या कंपनीतील शेअर्स! तज्ज्ञांनाही बसला धक्का आता टक्केवारीत न पाहता रुपयांमध्ये नेमका किती फायदा झाला असता तर तुम्ही एक लाख रुपये गुंतवले असते तर तुम्हाला 1 लाख 80 हजार रुपये मिळाले असते. 10 लाख गुंतवले असते तर 18 लाख रुपये मिळाले असते आणि एक कोटी गुंतवले असते तर 1 कोटी 80 लाख रुपये तुम्हाला मिळाले असते. मात्र शेअर बाजारात अंदाजे रिटर्न्सची अपेक्षा करणे चुकीचेच आहे. कारण गुंतवणूक करताना शेअर बाजारचे बारकावे लक्षात घेणे तितकेच महत्त्वाचे असते. नाहीतर नफ्याप्रमाणे तोटाही तितकाच सहन करावा लागतो. ‘बेरोजगारांना दरमहा मिळणार 3500 रुपये’, तुम्हालाही आला आहे का असा मेसेज? टाटा पॉवरच्या शेअरमध्ये होत असलेल्या तेजीवर स्वस्तिका इन्व्हेस्टमार्टचे रिसर्च हेड संतोष मीणा यांनी सांगितले की, गेल्या काही महिन्यांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांकडे ग्राहकांचा कल वाढताना दिसत आहेत. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती देखील वाढली आहे. ज्याचा फायदा टाटा उद्योग समूहाला होत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या