मुंबई : आता तुम्हाला दरवेळी तुमच्या जवळच्या बँकेत जाण्याची गरज नाही. याचं कारण म्हणजे SBI बँकेनं खास सुविधा सुरू आहे. या सुविधेमुळे ग्राहकांची अर्धी कामं ही घरबसल्या होणार आहेत. SBI ने Whatsapp बँकिंग सेवा सुरू केली आहे. त्यामुळे तुम्हाला बरेचसे अपडेट्स हे घरबसल्या मिळू शकतात. स्टेट बँक ऑफ इंडिया नेहमीच आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन अपडेट्स आणते. पूर्वी प्रत्येक कामासाठी बँकेत जावे लागायचं, आता आपण घरी बसून अनेक सेवांचा लाभ घेऊ शकतो. ज्यामध्ये आता घरात बसून तुमच्या व्हॉट्सअॅपवर नवीन सेवा उपलब्ध आहेत. बँकेने ग्राहकांना ट्विट करून ही माहिती दिली आहे. एसबीआयने ट्विट केले की, आता तुमची बँक व्हॉट्सअॅपवर उपलब्ध आहे. आपण आपल्या खात्यातील शिल्लक तपासू शकता. याशिवाय मिनी स्टेटमेंटही पाहू शकता. यासोबतच इतरही अनेक प्रकारची माहिती उपलब्ध आहे. या सेवांचा लाभ घ्या व्हॉट्सअॅप बँकिंग सेवेचा लाभ घेण्यासाठी आधी तुमचा नंबर रजिस्टर करावा लागेल त्यासाठी WAREG टाइप करा आणि स्पेस द्या त्यानंतर तुमचा खाते क्रमांक लिहा आणि तो मेसेज पाठवून द्या आता तुमच्या फोनमध्ये +919022690226 नंबर सेव्ह करा. EPFO खातं बंद झालं तर व्याज मिळणार, काय सांगतो नियम? सेव्ह केल्यानंतर या नंबरवर हाय लिहून पाठवा. बँक तीन पर्याय पाठवेल - अकाउंट बॅलन्स, मिनी स्टेटमेंट आणि व्हॉट्सअॅप बँकिंगमध्ये डी-रजिस्टरिंग. तुम्ही तुमच्या गरजेनुसार पर्याय निवडा. काही दिवसांपूर्वी एसबीआयने इंटरनेट बँकिंग व्यवहारांसाठी ई-मेलवरून ओटीपी कॉल करण्याची सुविधा सुरू केली होती. स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांना सुरक्षित इंटरनेट बँकिंग मिळावे यासाठी ईमेलवर वन टाइम पासवर्ड दिला आहे. किसान क्रेडिट कार्ड योजना नेमकी काय, कोण घेऊ शकतं लाभ?
एसबीआय इंटरनेट बँकिंगच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. होम पेजवर जाऊन हाय सिक्युरिटी ऑप्शन्सवर क्लिक करा. येथे तुम्ही तुमचा प्रोफाईल पासवर्ड टाका आणि तो टाका. एसएमएस आणि ईमेल निवडा आणि सबमिट करा. प्रोफाइल पासवर्ड आणि ईमेलवर सापडलेला वन टाइम पासवर्ड टाका.