JOIN US
मराठी बातम्या / मनी / FD Rates: SBI ने ग्राहकांना दिली खूशखबर; FD व्याजदरात वाढ, तुम्हाला कसा होणार फायदा?

FD Rates: SBI ने ग्राहकांना दिली खूशखबर; FD व्याजदरात वाढ, तुम्हाला कसा होणार फायदा?

SBI FD Rates: स्टेट बँक ऑफ इंडियानं फिक्स डिपॉझिट अर्थात FD च्या व्याजदरात वाढ केली आहे. त्यामुळे ग्राहकांना फायदा होणार आहे.

जाहिरात

FD Rates: SBI ने ग्राहकांना दिली खूशखबर, FD व्याजदरात केली वाढ

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 15 ऑगस्ट: अनेक जण आपल्या भविष्यासाठी विविध गोष्टींमध्ये गुंतवणूकीला प्राधान्य देत असतात. काही जण जमीन, फ्लॅट असा स्थावर मालमत्तेत गुंतवणूक करतात, तर काहीजण शेअर्स, सोनं, एफडी, म्युच्युअल फंड अशा जंगम मालमत्तेमध्ये गुंतवणूक करतात. गुंतवणूकीसाठी इतरही अनेक मार्ग आहेत, परंंतु अनेक लोक आजही बँकांच्या फिक्स डिपॉझिट अर्थात FD (Fix Deposite) मध्ये गुंतवणूक करायला प्राधान्य देतात. याचं कारण फिक्स डिपॉझिट करणं त्यांना सुरक्षित वाटतं आणि व्याजदरावर त्यांच्या गरजा भागू शकतात. तुम्ही देखील SBI च्या FDमध्ये गुंतवणूक करू इच्छित असाल, तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. SBI ने आपल्या ग्राहकांसाठी FD व्याजदरात 0.15 टक्के किंवा 15 बेसिस पॉइंट्सने वाढ केली आहे. एसबीआयच्या वेबसाइटनुसार, 2 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीवर 13 ऑगस्टपासून व्याजदरात वाढ लागू झाली आहे. सध्या SBI FD वर 2.9 टक्के ते 5.65 टक्के व्याज देत आहे. त्याच वेळी, ज्येष्ठ नागरिकांसाठी  3.40 टक्के ते 6.45 टक्के व्याजदर देत आहे. एसबीआयने शेवटच्या वेळी जून 2022 मध्ये व्याजदर वाढवला होता. SBIचे FD वरील नवे व्याजदर- 13 ऑगस्ट 2022 रोजी लागू झालेल्या FD दरांनुसार, बँकेने 180 दिवसांपासून ते 210 दिवसांच्या FD वरील व्याजदर 4.55 टक्के, एक वर्षापेक्षा जास्त आणि 2 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या FD वरील व्याजदर 5.30 टक्क्यांवरून 5.45 टक्के केला आहे. 2 वर्षांपेक्षा जास्त आणि 3 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर 5.5 टक्के, 3 वर्षांपेक्षा जास्त आणि 5 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर 5.5 टक्के व्याजदर करण्यात आला आहे. 5 वर्षे ते 10 वर्षे कालावधीच्या FD वरील व्याजदर 5.65 टक्क्यांवर नेला आहे. SBI ज्येष्ठ नागरिकांना 7 दिवस ते 10 वर्षांच्या FD वर 3.4 टक्के ते 6.45 टक्के व्याज देत आहे. SBI ने वेबसाईटवर दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ही वाढ केवळ नवीन FD केल्यावर किंवा कोणत्याही FD च्या मुदतपूर्तीनंतर नुतणीकरणावेळी दिली जाईल. हेही वाचा-  टाटा समूहाच्या ‘या’ शेअरमुळे काही गुंतवणूकदार मालामाल तर काहींचं मोठं नुकसान, वर्षभरात नेमकं काय घडलं? आरबीआयने वाढवले व्याजदर: गेल्या काही महिन्यांत आरबीआयने महागाई नियंत्रित करण्यासाठी रेपो दरात 1.4 टक्क्यांनी वाढ केली आहे, त्यानंतर देशातील सरकारी आणि गैर-सरकारी बँका व्याजदरात वाढ करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या