मुंबई, 17 जून : देशातली सर्वात मोठी बँक स्टेट बँक आॅफ इंडियानं (SBI) आपल्या ग्राहकांना फसवणुकीपासून वाचण्यासाठी काही उपाय सांगितलेत. गेल्या 11 वर्षात SBIमध्ये 23,734.74 कोटी रुपयांच्या 6,793 फसवणुकी समोर आल्यात. RBIच्या आकडेवारीनुसार बँकेत 50 हजाराहून जास्त फसवणुकीच्या तक्रारी नोंदवल्या गेल्यात. ज्यात 2.05 कोटी रुपयांची हेराफेरी झालीय. देशात दिवसेंदिवस वाढणाऱ्या बँक फसवणुकीच्या मामल्यात ग्राहकांना SBI नं सावध केलंय. कारण फ्राॅड फक्त आॅनलाइन ट्रान्झॅक्शननंच नाही, तर ATM द्वारेही होऊ शकतं. या टीप्स महत्त्वाच्या तुमच्या डिव्हाइसमध्ये नियमित अँटिव्हायरस स्कॅन चालू ठेवा. ब्राउझरच्या अॅड्रेस बारमध्ये URL टाइप करा. पब्लिक डिव्हाइस, ओपन नेटवर्क आणि फ्री वायफाय वापरू नका. हे वापरलंत तर तुमची खासगी माहिती लीक होण्याची शक्यता आहे. स्वीस बँकेत कुणाचे पैसे ? स्वित्झर्लंडनं जाहीर केली 50 भारतीयांची नावं इंटरनेट बँकिंग पासवर्ड नेहमी बदलत राहा. तुमचं बँक खातं आणि नेट बँकिंग यांची माहिती फोनमध्ये सेव्ह करून ठेवू नका. नेहमी लाॅग इन डेट आणि वेळ तपासून पहात राहा. लवकरच लाँच होतेय तुमच्याशी बोलणारी कार तुम्ही तुमच्या फोनमध्ये बँक खात्याचा नंबर, एटीएम कार्ड, पासवर्ड या माहितीचे फोटो ठेवलेत तर माहिती सहज लीक होऊ शकते. UIDAI ची खास भेट, ‘इथे’ तयार करून मिळेल आधार कार्ड फसवणुकीपासून वाचण्यासाठी तुम्ही फिशिंग ईमेलवर कधी क्लिक करू नका. आॅनलाइन ट्रॅन्झॅक्शन करताना नेहमी वन टाइम पासवर्ड ( OTP ) निवडा. यामुळे फसवणुकीची शक्यता कमी होते. नेट बँकिंगचा पासवर्ड, ओटीपी, पिन, कार्ड व्हेरिफिकेशन कोड ( CCV ) आणि युपीआय पिन कुणाबरोबर शेअर करू नका. तुम्ही पासवर्ड विसरलात, तर स्मार्ट पद्धतीनं तो पुन्हा शोधा किंवा बदला. बँकेत पैसे ठेवून तुम्ही निवांत राहू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला काळजी घ्यायला हवी. VIDEO: अमोल कोल्हेंचं संसदेत पहिलं पाऊल, पाहा EXCLUSIVE मुलाखत