JOIN US
मराठी बातम्या / मनी / SBI ग्राहकांसाठी अलर्ट! ATM मधून पैसे काढण्याआधी हा नियम जाणून घ्या

SBI ग्राहकांसाठी अलर्ट! ATM मधून पैसे काढण्याआधी हा नियम जाणून घ्या

तुम्ही जर SBI चे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई : तुम्ही जर SBI चे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. फसवणुकीपासून वाचण्यासाठी एसबीआयने नव्या टॅक्नोलॉजीचा उपयोग केला आहे. यासंदर्भात ग्राहकांना अलर्ट देण्यात आला आहे. आता ATM मधून पैसे काढण्याआधी हा नियम प्रत्येकाने समजून घेणं आवश्यक आहे. ग्राहकांना ATM शी त्यांचा नंबर जोडावा लागणार आहे. जेव्हा ATM मधून पैसे काढायचे असतील तेव्हा त्यांना एक OTP येणार आहे. तो OTP टाकून पैसे काढावे लागणार आहेत. जर OTP अपलोड केला नाही तर पैसे काढता येणार नाहीत. हा नियम 10 हजार रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम ATM मधून काढणाऱ्यांसाठी लागू करण्यात आला आहे. तुम्ही जर ATM मधून मोठी रक्कम काढणार असाल तर तुम्हाला OTP बंधनकारक असणार आहे. हा OTP सिंगल ट्रान्झाक्शनसाठी मान्य असेल. चोरीच्या घटना किंवा फसवणूक टाळण्यासाठी SBI आणि RBI ने अशा प्रकारचं प्रावधान केलं आहे.

SBI कडून अलर्ट तुमची जन्मतारीख, डेबिट कार्ड क्रमांक, इंटरनेट बँकिंग वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड, डेबिट कार्ड पिन, सीव्हीव्ही आणि ओटीपी यांसारखे क्रमांक कोणाशीही शेअर करू नका. याशिवाय एसबीआय, आरबीआय, सरकार, कार्यालय, पोलिस आणि केवायसी प्राधिकरणाच्या नावाने फोन कॉल्सपासून सावध रहा. फोनवरील कोणतेही अॅप किंवा तुमच्या फोनवरील कोणत्याही अज्ञात स्रोताद्वारे कोणतेही अॅप डाउनलोड करू नका. अनोळखी लोकांनी पाठवलेल्या मेल्स आणि मेसेजमधील कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका. याशिवाय तुम्हाला सोशल मीडिया किंवा मेसेज आणि फोनवर मिळणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या बनावट ऑफरपासून सावध रहा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या