JOIN US
मराठी बातम्या / मनी / SBI ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! आज रात्रीपासून 23 मे पर्यंत मिळणार नाहीत या सेवा

SBI ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! आज रात्रीपासून 23 मे पर्यंत मिळणार नाहीत या सेवा

देशातील सर्वात मोठी बँक असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (State Bank of India SBI) 44 कोटी ग्राहकांसाठी अत्यंत महत्त्वाची सूचना आहे. एसबीआयने ट्वीट करत ही महत्त्वाची सूचना (SBI Important Notice) जारी केली आहे.

जाहिरात

SBI CBO result 2020

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 21 मे: देशातील सर्वात मोठी बँक असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (State Bank of India SBI) 44 कोटी ग्राहकांसाठी अत्यंत महत्त्वाची सूचना आहे. एसबीआयने ट्वीट करत ही महत्त्वाची सूचना (SBI Important Notice) जारी केली आहे. अलीकडेच बँकेने काही सेवा बंद ठेवण्यात येणार असण्यासंदर्भात ट्वीट केलं आहे. शिवाय वेळेत तुमची बँकिंग संबंधातील कामं पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे. मेंटेनन्ससाठी (Maintenance) काही बँकिंग सेवा 21 मे पासून 23 मे पर्यंत काही काळासाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. एसबीआयने अशी माहिती दिली आहे की ग्राहकांना कोणत्याही समस्येशिवाय बँकिंगचा अनुभव मिळावा याकरता मेंटेनन्सचे काम केले जाते. स्टेट बँक ऑफ इंडियाने Important Notice अंतर्गत ही संबंधित सूचना जारी केली आहे. बँकेने यामध्ये असे सांगितले आहे की, 21 मे रोजी रात्री 10.45 पासून ते 22 मे रात्री 1 वाजून 15 मिनिटांपर्यंत, त्याचप्रमाणे 23 मे रोजी रात्री 02.40 वाजता ते पहाटे 06.10 वाजेपर्यंत मेंटेनन्सचं काम असणार आहे. बँकेने अशी माहिती दिली आहे की या दरम्यान एसबीआय ग्राहक INB/YONO/YONO Lite/UPI या सेवांचा वापर करू शकणार नाहीत.

संबंधित बातम्या

बँकेकडून अशाप्रकारे मेंटेनन्सची प्रक्रिया केली जाते, जेणेकरून बँक UPI प्लॅटफॉर्म, ऑनलाइन प्लॅटफॉर्म अपडेट करू शकेल. त्यामुळे ग्राहकांना चांगल्या बँकिंगचा अनुभव घेता येईल. 31 मे पूर्वी करा KYC अपडेट कोट्यवधी ग्राहकांसाठी एसबीआयने केवायसी अपडेट करण्याची तारीख वाढवली आहे. बँकेच्या मते केवायसी अपडेट करण्यासाठी ग्राहकांना बँकेत जाण्याचीही आवश्यकता नाही आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊन आहे. अशावेळी ग्राहका पोस्ट किंवा इमेलच्या माध्यमातून केवायसी कागदपत्रे जमा करू शकतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या