मुंबई : सणासुदीच्या काळात लोक जास्त ऑनलाईन ऑफर्सला भुलून ऑनलाइन खरेदी करतात. त्यानंतर तुमचे नंबर Emails तुम्ही जिथे जिथे दिलेले असतात त्या ठिकाणी ते सुरक्षित आहेत की नाही हे देखील पाहिलं जात नाही. SBI ने ग्राहकांना ट्वीट करून अलर्ट दिला आहे. ग्राहकांना काळजी घ्यायला सांगितलं आहे. फसवणूक करणाऱ्यांची तुमच्या खात्यावर वाईट नजर आहे. तुमची एक चूक तुमचं खातं रिकामं करू शकते. त्यामुळे तुम्ही काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. ज्यामुळे तुमची फसवणूक होणार नाही आणि तुमचं खातंही सुरक्षित राहील. तुम्हाला KYC साठी जर फोन आला आणि त्याने तुम्हाला सांगितलं की तुमचं KYC झालं नाही तुम्ही ते करा. तर त्यावर विश्वास ठेवू नका. बँक सहसा फोन करत नाही. लेखी व्यवहार असतो. त्यामुळे तुम्ही अशा कोणत्याही आमिषाला बळी पडू नका.
सरकारी बँकेचं ग्राहकांना मोठं दिवाळी गिफ्ट, तुमचं आहे का खातं आणि मिळणार का लाभ?कोणालाही तुमचा OTP नंबर सांगू नका. त्यामुळे तुमचं खातं रिकामं होऊ शकतं. तुमच्या खात्यावरील व्यवहार आणि त्यांची माहिती अनोळखी व्यक्तीला कधीही देऊ नका. अनोळखी व्यक्तीकडून आलेली लिंक, तुमच्या खात्याशी संबंधित असलेली माहिती यावर विश्वास ठेवू नका.
तुमचं KYC आणि इतर सिक्युरिटी अपडेट्स वेळोवेळी बँकेत जाऊन अपडेट करा. तुमचा इंटरनेट पासवर्ड कठीण ठेवा आणि तो बदलत राहा. त्यामुळे तुमचं खातं हॅक होऊ शकणार नाही. कोणालाही OTP शेअर करू नका. अनोळखी व्यक्तीकडून आलेल्या कोणत्याही SMS मधील लिंकवर क्लीक करू नका.