नवी दिल्ली, 01 मे: दर महिन्याच्या सुरुवातीला काही आर्थिक नियमांत बदल होत असतात. असेच काहीसे बदल ग्राहकांना आज नवीन महिन्याच्या पहिल्या तारखेपासून अनुभवायला मिळणार आहेत. ज्यांचा तुमच्या जीवनावर थेट परिणाम होताना पाहायला मिलेल. 1 मेपासून बँकिंगपासून विम्याच्या नियमांच बदल होत आहेत. त्याचप्रमाणे काही राज्यांमध्ये आजपासून लसीकरण मोहिमेचा तिसरा टप्पा सुरू होत आहे. जाणून घ्या 1 मेपासून कोणते नियम बदलणार आहेत, ज्यांचा तुमच्या जीवनावर थेट परिणाम होईल. 18 पेक्षा जास्त वय असणाऱ्यांचे होणार लसीकरण काही राज्यांमध्ये आजपासून लसीकरण मोहिमेचा तिसरा टप्पा सुरू होत आहे. काही राज्य अशी आहेत ज्याठिकाणी लशींचा तुटवडा असल्यामुळे तिसरा टप्पा सुरू होण्यासा काहीसा विलंब होणार आहे. 1 मे पासून 18 वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या नागरिकांचे लसीकरण होणार आहे. याकरता कोविन (Cowin App) च्या माध्यमांतून नोंदणी प्रक्रिया देखील सुरू झाली आहे. तुम्ही आरोग्य सेतू अॅपवर देखील रजिस्ट्रेशन करू शकता. 1 मे पासून गरिबांना मिळेल मोफन धान्य कोरोना काळात गरीब जनतेला पुन्हा खाण्याच्या बाबतीत हालअपेष्टा सहन करावी लागू नये याकरता पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना पुन्हा चालू करण्यात आली आहे. याअंतर्गत केंद्र सरकार 1 मे पासून गरिबांना 5 किलो धान्य मोफत देणार आहे. सरकारच्या या योजनेमध्ये 80 कोटींपेक्षा जास्त लोकांना फायदा होणार आहे. (हे वाचा- Gold Price Today: स्वस्त झालं सोनं, ‘Record High’ वरून 10000 रुपयांची घसरण ) LPG गॅस सिलेंडरचे दर बदलणार सरकारी तेल कंपन्यांकडून महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजी गॅस सिलेंडरचे नवे दर जारी केले जातात. काही वेळा दर वाढतात किंवा कमी होतात तर काही वेळा दर स्थीर ठेवले जातात. आजपासून हे नवे दर लागू केले जातील Axis Bank कमीतकमी बॅलन्स ठेवण्याच्या नियमात करणार बदल अॅक्सिस बँकेने खात्यामध्ये कमीतकमी रक्कम ठेवण्याचा नियम 1 मे पासून बदलण्याचा निर्णय घेतला आहे. 1 मे पासून मर्यादेनंतर एटीएममधून रोख रक्कम काढताना सध्यापेक्षा दुप्पट शूल्क द्यावे लागणार आहे. आता कॅश काढताना मर्यादा संपल्यानंतर प्रति 1000 रुपयांवर 10 रुपये वसूल केले जातील. अन्य काही सेवांसाठी द्यावे लागणारे शूल्क देखील बँकेने वाढवले आहे. 1 मेपासून Axis बँकेने कमीतकमी शिल्लक खात्यामध्ये ठेवण्याची मर्यादा वाढवली आहे. (हे वाचा- विमा कंपन्यांनी 1 तासात निकाली काढावे Covid रुग्णांचे कॅशलेस क्लेम : IRDAI ) पॉलिसी कव्हरची रक्कम होणार दुप्पट कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये वीमा नियामक IRDAI ने आरोग्य संजीवनी पॉलिसी कव्हर दुप्पट करण्याचे निर्देश दिले आहेत. वीमा कंपन्यांना सांगण्यात आलं आहे की, त्यांना 1 मे पर्यंत 10 लाख रुपये कव्हर असणारी पॉलिसी द्यावी लागेल. सध्या 1 एप्रिल पासून सुरू झालेल्या आरोग्य संजीवनी स्टँडर्ड पॉलिसीचं कव्हरेज 5 लाख रुपयेच आहे. आता लोकांना दुप्पट फायदा होऊ शकतो.