Home /News /money /

कोरोना बाधितांना मोठा दिलासा; एका तासात होणार कॅशलेस क्लेम

कोरोना बाधितांना मोठा दिलासा; एका तासात होणार कॅशलेस क्लेम

रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांना डिस्चार्ज मिळण्यास उशीर झाल्याने वेटिंगवर असलेल्या रुग्णांना त्रास सहन करावा लागत आहे.

    नवी दिल्ली, 30 एप्रिल: कोरोना संबंधित कोणत्याही हेल्थ इन्शुरन्सचे क्लेम एका तासात जमा करण्यात यावे, असे आदेश इन्शुरन्स रेगुलेटर अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडियाने (IRDAI) विमा कंपन्यांना दिले आहेत. यामुळे कोरोना बाधितांना रुग्णालयातून लवकर डिस्चार्ज मिळू शकेल. दिल्ली हायकोर्टाच्या (Delhi HC) एका आदेशानंतर 'इर्डा' ने विमा कंपन्यांना (insurance company) हे आदेश दिले आहेत. 28 एप्रिलला कोर्टाने विमा कंपन्यांना तत्काळ विमा जमा करण्याचेआदेश देण्याचे इर्डाला आदेश दिले होते. 28 एप्रिलला दिल्ली हायकोर्टाने विमा कंपन्यांना आदेश दिले आहे की, कोरोना बाधित रुग्णांच्या बिलला 30 ते 60 मिनिटांच्या आत पास करावे. तसेच विमा कंपन्या बिल मंजूर करण्यासाठी 6 ते 7 तास घेऊ शकत नाही, त्यामुळे रुग्णांना डिस्चार्ज मिळण्यास उशीर होतो आणि वेटिंगवर असलेल्या रुग्णांना यामुळे खूप वेळ वाट पहावी लागते, असंही कोर्टानं म्हटलंय. एका तासात पास करावा लागेल कॅशलेस क्लेम IRDAIने सर्व विमा कंपन्यांना म्हटलंय की, हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या कोरोना बाधित रुग्णांनी सर्व आवश्यक कागदपत्रे जमा केल्यानंतर एका तासाच्या आत कॅशलेस क्लेम निकाली काढावा लागेल. विमा कंपन्यांनी या संबंधित सर्व यंत्रणांना या नव्या नियमाबद्दल माहिती द्यावी, असेही आदेश इर्डाने दिले आहेत. वाचा: Remdesivir रुग्णालयानेच उपलब्ध करुन द्यावे, नातेवाईकांना आणण्यास सांगू नये; नागपूर खंडपीठाचा मोठा निर्णय रुग्णांना दिलासा मिळणार रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांना डिस्चार्ज मिळण्यास उशीर झाल्याने वेटिंगवर असलेल्या रुग्णांना त्रास सहन करावा लागत आहे. विमा कंपन्या आणि टीपीए बिल भरण्यास उशीर करत आहेत. त्यामुळे रुग्णालये रुग्णांना 8 ते 10 तास डिस्चार्ज देत नाही. त्यामुळे अनेक गरजू रुग्णांना वेळेवर बेड मिळत नसून त्यांना प्राणास मुकावे लागत आहे. इर्डाच्या या आदेशानंतर वेळेवर क्लेम निकाली काढल्यास रुग्णांना दिलासा मिळेल. याआधी 2 तासांत कॅशलेस क्लेम (cashless claim) निकाली काढण्याचे आदेश इर्डाने दिले होते. IRDAI ने विमाधारकांना त्यांच्या विमा कंपन्यांना अशा विसंगतींबद्दल माहिती देण्यास मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. तसेच रुग्णालयाकडून काही अडचणी आल्यास विमा कंपन्या संबंधित राज्य सरकारांकडे रुग्णालयांबद्दल तक्रारी नोंदवू शकतात.
    First published:

    Tags: Coronavirus, Insurance

    पुढील बातम्या