JOIN US
मराठी बातम्या / मनी / 'या' बँकेला RBI ने ठोठावला 1 लाख रुपयांचा दंड, वाचा काय आहे कारण

'या' बँकेला RBI ने ठोठावला 1 लाख रुपयांचा दंड, वाचा काय आहे कारण

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) सर्वोदय कमर्शिअल को-ऑपरेटिव्ह (Sarvodaya Commercial Co-operative Bank) बँकेला 1 लाखाचा दंड (Monetary Penalty) ठोठावला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 28 जुलै: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) सर्वोदय कमर्शिअल को-ऑपरेटिव्ह (Sarvodaya Commercial Co-operative Bank) बँकेला 1 लाखाचा दंड (Monetary Penalty) ठोठावला आहे. डिरेक्टर्स, नातेवाईक तसंच कंपन्या/फर्म्सना कर्ज किंवा आगाऊ रक्कम देताना बँकेने मार्गदर्शक तत्त्वांचं पालन न केल्यानं आरबीआयने (RBI) हा दंड ठोठावला आहे. RBI ने अशी माहिती दिली आहे की, हा दंड बँकिंग रेग्यूलेशन कायदा 1949 च्या कलम 46 (4) (i) आणि कलम 56 सह कलम 47 A (1) (C) मधील सुधारणांअंतर्गत ठोठावण्यात आला आहे. ही कारवाई नियामक अनुपालनाच्या (Regulatory Compliance) कमतरतेवर आधारित आहे. बँक आणि त्याच्या ग्राहकांमधील कोणत्याही व्यवहाराबाबत किंवा कराराच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह ठेवण्यासाठी नाही. बँकेला दंड ठोठावण्याचे कारण 31 मार्च 2018 रोजी बँकेच्या आर्थिक स्थितीबाबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून वैधानिक तपासणी (Statutory Inspection) करण्यात आलं होती. या तपासणीचा अहवाल आणि इतर काही संबंधित अहवालांच्या आधारे असे आढळून आले की बँकेने रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केलेले नाही. परिणामी बँकेला एक लाखांच्या दंडाच्या कारवाईला सामोरं जावं लागत आहे. हे वाचा- ही बँक स्वस्तात विकत आहे प्रॉपर्टी, वाचा कशाप्रकारे खरेदी कराल स्वत:चं घर? या अहवालाच्या आधारे बँकेला नोटीस देखील पाठवण्यात आली होती. RBI च्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न केल्याप्रकरणी कारणे दाखवा नोटीस बँकेला पाठवण्यात आली होती. बँकेच्या अशा कारभारामुळे त्यांच्यावर दंड का आकारू नये असा सवाल यात विचारण्यात आला होता. बँकेचं उत्तर, वैयक्तिक सुनावणी यानंतर आरबीआयने दंड ठोठावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ही मॉनेटरी पेनल्टी लागू करण्यात आली. हे वाचा- पुढील महिन्यात डबल फायदा, पगारात होणार वाढ; जाणून घ्या किती मिळणार वाढीव रक्कम याआधी देखील रेग्यूलेटरी गाइडलाइन्सचं पालन न केल्याने आरबीआयने चार सहकारी बँकांना दंड ठोठावला आहे. यामध्ये हैदराबाद स्थित आंध्र प्रदेश महेश सहकारी शहरी बँकेवर लागू करण्यात आलेल्या 112.50 लाख रुपयांच्या दंडाचा देखील समावेश आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या