मुंबई : महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी RBI ने सलग चारवेळा रेपो रेट मध्ये वाढ केली आहे. सलग चारवेळा रेपो रेट वाढवल्याने कर्ज आणि EMI चा ओझं वाढलं आहे. खिशाला चांगलीच कात्री लागली आहे. 14 डिसेंबर रोजी US फेडरलची मिटिंग आहे. त्याआधीच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया पुन्हा एकदा व्याजदर वाढवण्याच्या तयारीत आहे. US फेडरल बँकेनं सप्टेंबर अखेरीस 0.75 बेसिस पॉईंटने व्याजदर वाढवलं होतं. त्यानंतर जगभरातील बँकांनी महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी व्याजदरात वाढ केली होती. आता पुन्हा एकदा RBI 0.25-0.35 टक्क्यांनी रेपो रेटमध्ये वाढ करू शकते. याचा सर्वसामान्य नागरिकांवर मोठा परिणाम होणार आहे. यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे EMI, होम लोन, कार लोन आणि पर्सनल लोन महाग होणार आहेत. जे नवीन लोन घेणार त्यांना वाढलेल्या दराने लोन घ्यावं लागेल. ज्यांचा EMI सुरू आहे त्यांचा EMI वाढणार आहे.
5 दिवस 5 मोठे निर्णय, ज्याचा तुमच्या आयुष्यावर होणार मोठा परिणाम7 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता RBI चे अध्यक्ष शक्तीकांत दास महत्त्वाची घोषणा करणार आहेत. रेपो दरात कितीने वाढ होणार याबाबत महत्त्वापूर्ण निर्णय येऊ शकतो. तर फेब्रुवारीत पुन्हा रेपो रेट वाढवणार का याचेही संकेत दिले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या निर्णयाकडे सर्वसामान्य नागरिकांचं लक्ष लागलं आहे.