JOIN US
मराठी बातम्या / मनी / RBI च्या निर्णयामुळे गृह आणि कार कर्जाचा EMI किती वाढेल? समजून घ्या गणित

RBI च्या निर्णयामुळे गृह आणि कार कर्जाचा EMI किती वाढेल? समजून घ्या गणित

RBI ने सलग चौथ्यांदा रेपो दर वाढवला आहे. यामागे दोन मोठी कारणं असल्याचं सांगितलं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई : RBI ने सलग चौथ्यांदा रेपो दर वाढवला आहे. यामागे दोन मोठी कारणं असल्याचं सांगितलं आहे. महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं आहे. कोरोना आणि रशिया-युक्रेन युद्धाचा मोठा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर झाला. दुसरीकडे कुठे अति पावसामुळे नुकसान तर कुठे उत्पन्न कमी आलं आहे. याशिवाय US फेडने 0.75 टक्के व्याजदरात वाढ केली आहे. तर दुसरीकडे US डॉलरचं मूल्यही वाढलं आहे. महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी पुन्हा एकदा 0.50 टक्क्यांनी व्याजदरात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे कर्ज महाग होणार आहेत. EMI महाग होणार आहेत. सणासुदीच्या काळात ही दरवाढ केल्यानं ग्राहकांच्या खिशाला चांगलीच कात्री लागणार आहे. या निर्णयानंतर शेअर मार्केटमध्ये बँकांच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळाली आहे. रेपो दरात वाढ केल्यास कर्ज घेताना जास्त पैसे भरावे लागणार आहेत. आगामी काळात आणखी रेपो रेट वाढण्याचे संकेतही देण्यात आले आहेत. याचा परिणाम बँका ग्राहकांवर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे घरांच्या विक्रीत आणखी वाढ होण्याची अपेक्षा आहे.

RBI Monetary Policy Committee Meet : सलग चौथ्यांदा महागला रेपो रेट, 0.50% वाढ, कर्ज महागले

रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयामुळे बँकांनी दिलेली कर्जे आणखी महाग होणार आहेत. बँकेची अनेक कर्जे थेट रेपो दराशी जोडलेली असतात. त्यामुळे रेपो दरातील कोणताही बदल हा ग्राहकांवर परिणाम करणारा ठरतो. पॉलिसी दरांमध्ये वेळोवेळी वाढ झाल्यामुळे गृहकर्जाचे दर आता ८ टक्क्यांहून अधिक वाढणार आहे. अशा परिस्थितीत घर घेणं आवाक्याबाहेर जाण्याची शक्यता आहे.

समजा एका व्यक्तीने 7.55% दराने 20 वर्षांसाठी 30 लाख रुपयांचे गृहकर्ज घेतले. त्याच्या कर्जाचा EMI 24,260 रुपये आहे. 20 वर्षात त्याला या दराने 28,22,304 रुपये व्याज द्यावे लागेल. त्याला 30 लाखांऐवजी एकूण 58,22,304 रुपये द्यावे लागतील.

Vodafone-Idea ग्राहकांची चिंता वाढली, पैसे न भरल्यास नोव्हेंबरपासून बंद होऊ शकते सेवा

संबंधित बातम्या

कर्ज घेतल्यानंतर एका महिन्यात, RBI ने रेपो रेट 0.50% ने वाढवला. तर त्यामुळे बँका देखील व्याजदर 0.50% वाढवतात. आता जेव्हा तुमचा मित्र किंवा मैत्रिण किंवा नातेवाईक त्याच बँकेत कर्ज घेण्यासाठी जातील तेव्हा बँक त्यांना 7.55% ऐवजी 8.05% व्याजदर सांगेल. बदलेल्या व्याजदराने त्यांना कर्ज घ्यावं लागेल. तुमच्यासारखं त्यांनीही 30 लाख रुपये फक्त 20 वर्षांसाठी कर्ज घेतलं. पण त्याचा EMI 25,187 रुपये असेल. म्हणजेच तुमच्या EMI पेक्षा 927 रुपये जास्त. यामुळे तुमच्या मित्राला 20 वर्षात एकूण 60,44,793 रुपये द्यावे लागतील. तुमच्या रकमेपेक्षा ही रक्कम 2,22,489 जास्त असणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या