मुंबई: आजकाल 2 हजार रुपयांच्या नोटा गायबच झाल्यासारखं वाटत आहे. सगळीकडे 500 रुपयांचा नोटा दिसतात. 2 हजार रुपयांच्या नोटा अगदी कमी मिळतात किंवा फार कमी सध्या व्यवहारात पाहायला मिळत आहेत. याच नोटेबाबत आता RBI ने महत्त्वाची माहिती दिली आहे. तुमच्याकडे जर 2 हजार रुपयांची नोट असेल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. नोटबंदीनंतर भारतात 500 आणि 2 हजारच्या नोटा मोठ्या प्रमाणात वाढल्या. डिजिटल पेमेंटचं प्रमाणही वाढलं. कोरोना काळात तर लोक नोटा सोडून डिजिटल पेमेंट जास्त वापरू लागली. त्यानंतर 2 हजार रुपयांच्या नोटा चलनात कमी झाल्या. जर तुमच्याकडे 2 हजार रुपयांची नोट असेल तर ती खरी आहे की बनावट याबाबत माहिती घेणं आवश्यक आहे.
कमी गुंतवणुकीत रोज हजार रुपये कमवण्याची संधी; जाणून घ्या कोणता आहे ‘हा’ व्यवसायगेल्या तीन वर्षांपासून 2 हजार रुपयांची एकही नोट छापली नाही. आरटीआयनुसार, 2019-20, 2020-21 आणि 2021-22 या काळात 2000 रुपयांच्या नव्या नोटांची छपाई झाली नाही. त्यामुळे चलनात फार कमी नोटा आहेत. सध्या रिझर्व्ह बँकेकडून बाजारात 2 रुपये, 5 रुपये, 10, 20, 50, 100, 200, 500 आणि 2000 रुपयांच्या नोटा छापल्या आहेत. 8 नोव्हेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद करण्याची घोषणा केली होती. त्याबदल्यात 2000 आणि 500 रुपयांच्या नव्या नोटा जारी करण्यात आल्या.
लोन घेणाऱ्यांसाठी बँक ऑफ महाराष्ट्रने दिली मोठी माहितीआता या घडीला बाजारात 2000 रुपयांच्या नोटा फारच कमी दिसत आहेत. आरबीआयकडून मिळालेल्या माहितीनुसार, 31 मार्च 2022 पर्यंत देशभरात चलनात येणाऱ्या 2000 रुपयांच्या नोटांचा वाटा केवळ 13.8 टक्क्यांवर आला आहे. तर यासोबत बनावट नोटांचं प्रमाण वेगानं वाढलं आहे. 2018 च्या तुलनेत 2020 मध्ये बनावट नोटा जास्त वाढल्या आहेत. 2 हजार रुपयांच्या बनावट नोटांचं प्रमाण वाढल्याने सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे. तुमच्याकडे आलेली नोट बनावट तर नाही ना हे देखील तपासून पाहायला हवं. तसं असेल तर तातडीने तक्रार दाखल करा. नाहीतर तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं.