मुंबई, 25 ऑक्टोबर : शेअर बाजारातील (Share Market) बिग बुल म्हणून ओळख असलेले मोठे गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala Stocks) यांनी जुलै-सप्टेंबर या तिमाहीत रियल्टी कंपनी इंडियाबुल्स रिअल इस्टेटचे (Indiabulls Real Estate Share Price) शेअर्स खरेदी केले आहेत. सोमवारी दिवसभराच्या ट्रेडदरम्यान, हा रियल्टी स्टॉक बीएसईवर 4 टक्के खाली घसरुन सुमारे 156 रुपयांच्या आसपास ट्रेड करत होता. इंडियाबुल्स रिअल इस्टेटच्या बीएसई शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, राकेश झुनझुनवाला यांनी 30 सप्टेंबरच्या अखेरीस कंपनीमध्ये 50,00,000 शेअर्स किंवा 1.10 टक्के भागभांडवल ठेवले होते. झुनझुनवाला यांचे नाव मागील दोन तिमाही - जून आणि मार्च 2021 या तिमाहीत शेअर होल्डर्सच्या यादीत नव्हते. Rakesh Jhujhunwala यांनी आपल्या आवडत्या कंपनीत गुंतवणूक वाढवली, यावर्षी कंपनीकडून 60 रिटर्न्स मात्र कागदपत्रांनुसार डिसेंबर 2020 च्या तिमाहीत, राकेश झुनझुनवाला यांचे इंडियाबुल्स रिअल इस्टेट कंपनीमध्ये 1.10 टक्के भागभांडवल ठेवले होते. इंडियाबुल्स रिअल इस्टेटने गेल्या एका वर्षात 225 टक्के मल्टीबॅगर रिटर्न दिले आहे. केवळ 2021 मध्ये स्टॉकच्या किंमती 95 टक्क्यंनी वाढली आहे. ‘या’ शेअरमधून गुंतवणूकदारांना वर्षभरात 168 टक्के रिटर्न्स, अजूनही गुंतवणुकीची संधी इंडियाबुल्स रिअल इस्टेटच्या शेअरची किंमत 1 जानेवारी 2021 ला 80.95 रुपये होती, जी आता 157 रुपयांच्या आसपास पोहोचली आहे. इंडियाबुल्स रिअल इस्टेट ही देशातील सर्वात मोठी रिअल इस्टेट कंपन्यांपैकी एक आहे ज्याची कमर्शियल आणि रेसिडेन्शियल रिअल इस्टेट या दोन्ही विभागांमध्ये मोठं काम आहे. ICICI बँकेचे शेअर ऑल टाईम हायवर; गुंतवणुकीबाबत तज्ज्ञांचं म्हणणं काय? राकेश झुनझुनवाला यांनी सप्टेंबरच्या तिमाहीत इंडियाबुल्स ग्रुपच्या दुसर्या कंपनीतील हिस्सा कमी केला. सप्टेंबर तिमाहीपर्यंतच्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, झुनझुनवाला यांच्याकडे इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्समध्ये 50,00,000 शेअर्स किंवा 1.08 टक्के स्टेक होते, जे एप्रिल-जुलै तिमाहीत 2.17 टक्के होते.