'या' शेअर्सनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; पुढे काय होणार? वाचा तज्ज्ञांचं मत
मुंबई, 14 सप्टेंबर: शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणे जोखीम मानली जाते. मात्र काही स्टॉक्स आहे ज्यांनी गुंतवणूकदारांना भरपूर परतावा दिला आहे. काही शेअर्समध्ये तर गुंतवणूककदारांची थोड्या गुंतवणुकीत आयुष्यभराची कमाई झाली आहे. राज रेयॉन इंडस्ट्रीज शेअरही त्यापैकीच एक आहे. या शेअरमुळे गुंतवणूकदार मालामाल बनले आहे. या कंपनीचा शेअर गेल्या 52 आठवड्यांतील नीचांकी 1.35 वरून वाढला आहे. राज रेयॉनचा शेअर आता 13.50 रुपयांवर पोहोचला आहे. या शेअरने गेल्या एका वर्षात 5,300 टक्के मल्टीबॅगर परतावा दिला आहे. दुसरीकडे, जर आपण त्याच्या तीन वर्षांच्या कामगिरीवर नजर टाकली तर या शेअरने भरघोस परतावा दिला आहे. SBI आणि PNB खातेधारकांनी हे नंबर सेव्ह करा, अनेक सुविधांचा लाभ घरबसल्या मिळेल तीन वर्षात करोडपती गेल्या 3 वर्षात राज रेयॉनने 26900 टक्के परतावा देऊन आपल्या गुंतवणूकदारांना लखपती ते करोडपती बनवले आहे. जर एखाद्या गुंतवणूकदाराने 3 वर्षांपूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज त्याचे 1 लाख रुपये 2 कोटी 70 लाख झाले असते. घराच्या नुतनीकरणासाठीही मिळतं कर्ज! गृहकर्जाचे ‘हे’ प्रकार अनेकांना माहित नाहीत, वाचा संपूर्ण माहिती 5 जानेवारी 2007 रोजी एनएसईवर राज रेयॉनचे शेअर्स 5 रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळत होते. त्याच वेळी, 4 जानेवारी 2019 रोजी त्याची किंमत केवळ 15 पैशांवर कमी करण्यात आली. 9 सप्टेंबर 2021 पर्यंत त्याची किंमत केवळ 25 पैशांपर्यंतच राहिली. यानंतर, जेव्हा शेअरने तेजी पकडली त्याने मागे वळून पाहिले नाही. आता हा स्टॉक 15 पैशांवरून 13.50 रुपयांवर पोहोचला आहे.