मुंबई, 13 सप्टेंबर: घर आणि मालमत्ता खरेदी करणं हे अलीकडच्या काळात सर्वसामान्यांच्या आव्याक्याबाहेरचं झालं आहे. घरं आणि मालमत्तेच्या किंमती सामान्य लोकांच्या नियंत्रणाबाहेर असतात. अशा परिस्थितीत घर घेण्यासाठी गृहकर्ज घेणं हा सर्वात सोपा मार्ग आहे. रिअल इस्टेटमध्ये पैसे गुंतवण्याचा हा सर्वात लोकप्रिय मार्ग आहे. याचेही अनेक फायदे आहेत. सध्या बाजारात अनेक प्रकारची गृहकर्ज उपलब्ध आहेत. यापैकी अनेक खरेदीदारांना माहीत देखील नसतं. आपल्याला आपल्या गरजांसाठी किती प्रकारची कर्जे मिळू शकतात आज जाणून घेऊया. 1. होम पर्चेज लोन: ज्यांना नवीन घर किंवा मालमत्ता खरेदी करायची आहे त्यांच्यासाठी हे कर्ज उपयुक्त आहे. गृहकर्ज निश्चित किंवा फ्लोटिंग दरानं मिळू शकतं आणि परतफेडीचा कालावधी 30 वर्षांपर्यंत वाढविला जाऊ शकतो. 2. प्री-अप्रूव्ड होम लोन: ज्या लोकांनी घर खरेदी करण्यासाठी आधीच क्रेडिट पात्रता, उत्पन्न मर्यादा आणि आर्थिक स्थिरतेविषयक बँकेच्या प्राथमिक स्तरावरील अटी पार केल्या आहेत, अशांसाठी हे कर्ज असते. 3. गृह विस्तार/नवीनीकरण लोन: जर तुम्ही जमिनीच्या काही तुकड्यावर घर किंवा निवासी युनिट बांधण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी गृह बांधकाम कर्ज हा एक आदर्श पर्याय आहे. तुम्ही हे कर्ज जास्तीत जास्त 15 वर्षांच्या कालावधीसाठी घेऊ शकता. हेही वाचा- तुमच्याकडे हे ATM कार्ड असेल तर आता बिनधास्त फिरा! कॅब राइडवर मिळतोय 50 टक्के डिस्काउंट 4. प्लॉट लोन: प्लॉट लोन हा एक प्रकारचा गृहकर्ज आहे, विशेषत: घर बांधण्यासाठी भूखंड खरेदी करण्यासाठी. या कर्जाअंतर्गत वितरित केलेल्या कर्जाची रक्कम इतर गोष्टींबरोबरच तुम्ही खरेदी करू इच्छित असलेल्या प्लॉटच्या मूल्यावर आणि तुमच्या क्रेडिट प्रोफाइलवर अवलंबून असेल. 5. टॉप-अप कर्ज: टॉप-अप कर्ज, नावाप्रमाणेच, कर्जदार त्याच्या सध्याच्या गृहकर्जाव्यतिरिक्त मिळवू शकणारे कर्ज आहे. या कर्जाचा वापर वैयक्तिक गरजा पूर्ण करण्यासाठी केला जाऊ शकतो जसे की विद्यमान मालमत्तेचे नूतनीकरण करणे, तुमच्या व्यवसायाचा विस्तार करणे, तुमच्या मुलाच्या शिक्षणासाठी निधी देणे, लग्नासाठी वित्तपुरवठा करणे इ. 6. गृह विस्तार/नूतनीकरण कर्ज: ज्यांना त्यांच्या सध्याच्या मालमत्तेचं नूतनीकरण करायचं आहे किंवा ते वाढवायचं आहे त्यांच्यासाठी हे उपयुक्त गृहकर्ज आहे. कर्जाचा वापर आतील किंवा बाहेरील नूतनीकरण/सुधारणेसाठी केला जाऊ शकतो, जसे की व्हाईटवॉशिंग/पेंटिंग, प्लंबिंग/स्वच्छता, फ्लोअरिंग किंवा टाइलिंग, अतिरिक्त खोल्या बांधणं इ. 7. होम लोन बॅलन्स ट्रान्सफर: गृहकर्जाची थकबाकी विद्यमान कर्जदाता बँकेकडून नवीन बँकेकडे हस्तांतरित केली जाते. यामुळं तुम्हाला कमी व्याजदर किंवा दीर्घ परतफेडीचा कालावधी यासारख्या अधिक अनुकूल अटींचा फायदा घेता येऊ शकतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.