JOIN US
मराठी बातम्या / मनी / IRCTC Tour Package: भारत गौरव ट्रेनने 7 ज्योतिर्लिंगांसह शिर्डीचे दर्शन घेण्याची संधी; स्वस्तात होईल देवदर्शन!

IRCTC Tour Package: भारत गौरव ट्रेनने 7 ज्योतिर्लिंगांसह शिर्डीचे दर्शन घेण्याची संधी; स्वस्तात होईल देवदर्शन!

IRCTC Tour Package: तुम्हाला जुलै महिन्यात धार्मिक यात्रेवर जायचं असेल तर आयआरसीटीसीने तुमच्यासाठी शानदार पॅकेज आणलंय. आयआरसीटीसी तुम्हाला 7 ज्योतिर्लिंग आणि शिर्डी साई बाबांच्या दर्शनाची संधी देत आहे. चला तर मग जाणून गेऊया भाडं आणि टूर पॅकेजचे डिटेल्स…

जाहिरात

आयआरसीटीसी टूर पॅकेज

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

IRCTC Tour Package: भारतीय रेल्वे आपल्या प्रवाशांसाठी विविध सुविधा पुरवत असते. आयआरसीटीसीकडून विविध पर्यटन स्थळांसोबतच धार्मिक स्थळांचे टूर पॅकेजही आणले जातात. ज्या मार्फत प्रवाशांना विविध ठिकाणी स्वस्तात फिरुन येण्याची संधी मिळते. आता आयआरसीटीसी ने 7 ज्योतिर्लिंगांच्या दर्शनासाठी एक खास पॅकेज लॉन्च केलं आहे. भारत गौरव टूरिस्ट ट्रेनने तुम्हाला स्टॅच्यू ऑफ यूनिटी, 7 ज्योतिर्लिंग आणि शिर्डीच्या साई बाबांच्या दर्शनाची संधी मिळेल. संपूर्ण पॅकेजसाठी भाडे 19,300 रुपये प्रति व्यक्ती पासून सुरू होते. मध्य प्रदेशातील जबलपूर रेल्वे स्टेशनपासून हा प्रवास सुरू होईल. यासोबतच, प्रवासी जबलपूर, नरसिंगपूर, इटारसी, नर्मदापुरम, राणी कमलापती, शुजालपूर, उज्जैन, देवास, इंदूर आणि रतलाम स्टेशनवरुन चढू किंवा उतरू शकतील. हा प्रवास 18 जुलै 2023 रोजी सुरू होईल. IRCTC: चार धाम यात्रेला जायचंय? आयआरसीटीसीने आणलंय खास पॅकेज, पाहा कधी होतंय सुरु या टूर पॅकेजच्या खास गोष्टी पॅकेजचं नाव : 7 Jyotirling Yata By Bharat Gaurav Train (NZBG21) डेस्टिनेशन - द्वारका, सोमनाथ, नाशिक, शिर्डी, छत्रपती संभाजीनगर, परळी, परभणी, पुणे आणि केवडिया टूर कालावधी- 11 दिवस/10 रात्री ट्रॅव्हलिंग मोड- भारत गौरव पर्यटक ट्रेन जेवणाचं प्लानिंग - नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण निघण्याची तारीख- 18 जुलै 2023 भाडं किती असणार? टूर पॅकेजचे दर श्रेणीनुसार वेगवेगळे असतील. स्लीपरमध्ये प्रवास केल्यास प्रति व्यक्ती 19,300 रुपये मोजावे लागतील. थर्ड एसीमध्ये प्रवास केल्यास प्रति व्यक्ती 31,500 रुपये मोजावे लागतील. Indian Railway: एकाच ट्रॅकवर किती अंतरावर चालतात दोन ट्रेन? मागील ट्रेनविषयी लोको पायलटला कशी मिळते माहिती? या ठिकाणांना भेट देणार आहे- द्वारका- द्वारकाधीश मंदिर, बेट द्वारका मंदिर आणि नागेश्वर महादेव ज्योतिर्लिंग मंदिर. सोमनाथ- सोमनाथ ज्योतिर्लिंग मंदिर. नाशिक - त्र्यंबकेश्वर शिव ज्योतिर्लिंग मंदिर. शिर्डी- शिर्डी मंदिर छत्रपती संभाजीनगर- घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर परळी- परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग मंदिर परभणी- औंढा नागनाथ ज्योतिर्लिंग मंदिर पुणे- भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिर केवडिया - स्टॅच्यू ऑफ युनिटी

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या