रेल्वे नॉलेज
Railway knowledge: एखाद्या व्यक्तीला अचानक कुठेतरी जावे लागले तर तो तत्काल तिकीट घेऊन निघून जातो. पण तत्कालचा ऑप्शन नसल्यास आणि जाणे अत्यंत आवश्यक असल्यास, तो विना तिकीट ट्रेन मध्ये प्रवास करू शकतो का? अशा वेळी त्याला टीटीईने पकडले तर त्याला जेलमध्ये जावं लागेल की प्रवास करण्याची परवानगी दिली जाईल. आज आम्ही तुम्हाला ट्रेनमध्ये विना तिकीट प्रवास करण्याचे नियम सांगत आहोत.
तुम्ही विना तिकीट ट्रेनमध्ये प्रवास केलात तर तुम्हाला ना तुरुंगवास भोगावा लागणार आहे ना तुम्हाला सूट मिळणार आहे. यासाठी तुम्हाला रेल्वेचे काही नियम पाळावे लागतील. तसे, जर तुम्हाला ट्रेनमध्ये प्रवास करायचा असेल तर तुमच्याकडे व्हॅलिड तिकीट असणे आवश्यक आहे. रेल्वेच्या म्हणण्यानुसार, विना तिकीट ट्रेनमध्ये प्रवास करणे कायदेशीर गुन्हा आहे. तुम्ही हा ऑप्शन निवडू शकता तुम्हाला खरोखरच काही महत्त्वाच्या कामासाठी प्रवास करायचा असेल आणि तुमच्याकडे रेल्वेचं कन्फर्म तिकीट नसेल. तर अशा परिस्थितीत तुम्ही प्लॅटफॉर्म तिकीट किंवा जनरल तिकिटाद्वारे प्रवास करू शकता. यासाठी तुम्हाला प्लॅटफॉर्म तिकीट काढावे लागेल आणि ट्रेनमध्ये जाऊन टीटीईला भेटावं लागेल. तुम्हाला कुठे प्रवास करायचा आहे हे तुम्हाला TTE ला सांगावे लागेल. अशा वेळी टीटीई तुमचं तिकीट बनवून देतो आणि त्यानंतर तुम्ही ट्रेनमध्ये प्रवास करू शकता. तुम्हाला स्टेशनवरून प्लॅटफॉर्म तिकीट फक्त 10 रुपयांमध्ये मिळते.
Railways Facts : पॅसेंजर ट्रेनमध्ये का लावले जात नाहीत 24 पेक्षा जास्त कोच, नेमकं कारण काय?250 रुपये दंड भरावा लागेल तुमच्याकडे रिझर्वेशन तिकीट नसल्यास तुम्हाला 250 रुपये दंड आणि तुम्ही जिथून ट्रेनमध्ये चढला होता तिथून निश्चित स्थळापर्यंतचं भाडंही भरावं लागेल. तसंच, ट्रेनमध्ये सीट रिकामं असल्यास, टीटीई देखील तुम्हाला सीट देऊ शकते आणि नंतर तुम्ही आरामात प्रवास करू शकता. टीटीईकडे एक हँड हेल्ड मशीन असते. ज्याद्वारे तो ट्रेनमधील प्रवाशाला तिकीट देऊ शकतो.
Railway News: अनोखी आहे देशातील ही सर्वात छोटी रेल्वे यात्रा! 9 मिनिटात संपतो प्रवासप्लॅटफॉर्म तिकीट ऑनलाइनही बुक करता येईल
विना तिकीट ट्रेनमध्ये चढल्यानंतर तुम्ही ऑनलाईन तिकीट देखील बुक करू शकता. यासाठी रेल्वेकडून यूटीएस अॅपवर अनारक्षित रेल्वे तिकीट बुक करण्याची सुविधा ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आली आहे. याद्वारे, अनारक्षित तिकिटांव्यतिरिक्त, तुम्ही प्लॅटफॉर्म तिकीट देखील बुक करू शकता.