JOIN US
मराठी बातम्या / मनी / 2-3 दिवसात रेल्वे काऊंटरवर करता येणार स्पेशल गाड्यांसाठी तिकीट बुकिंग, रेल्वे मंत्र्यांची घोषणा

2-3 दिवसात रेल्वे काऊंटरवर करता येणार स्पेशल गाड्यांसाठी तिकीट बुकिंग, रेल्वे मंत्र्यांची घोषणा

रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी (Piyush Goyal) यांनी सामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी 200 नॉन एसी स्पेशल ट्रेन धावणार असल्याची घोषणा केली होती. दरम्यान 2-3 दिवसात याकरता रेल्वे काऊंटरवर देखील बुकिंग करता येईल अशी माहिती त्यांनी दिली

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 21 मे : कोरोना व्हायरस (Coronavirus)चे संक्रमण रोखण्यासाठी देशामध्ये लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा (Lockdown 4.0) आज 58 वा दिवस आहे. अशावेळी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी (Piyush Goyal) यांनी सामान्य जनतेला दिलासा देणारी एक घोषणा मंगळवारी केली होती. 200 स्पेशल नॉन एसी रेल्वे सुरू करण्याबाबत ही घोषणा करण्यात आली होती. रेल्वे मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी ट्रेनच्या तिकिटांचे बुकिंग देशभरातील जवळपास 1.7 लाख कॉमन सर्व्हिस सेंटरवर सुरू करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे येत्या 2-3 दिवसात काही देशभरातील काही निवडक रेल्वे स्टेशनवर काऊंटर रिझर्व्हेशन देखील करता येणं शक्य होणार आहे. याकरता सध्या प्रोटोकॉल तयार केले जात आहेत. म्हणजेच रेल्वे काऊंटवर जाऊन देखील तिकिट आरक्षण करता येणं शक्य होणार आहे. (हे वाचा- विमान प्रवासासाठी या नियमांचे पालन केल्यास मिळणार परवानगी, सरकारकडून SOP जारी ) रेल्वे मंंत्र्यांनी अशी माहिती दिली की दुपारी 12 वाजेपर्यंत 73 ट्रेन बुकिंगसाठी उपलब्ध होती. आतापर्यंत 149025 तिकीट बुक करण्यात आले आहेत. श्रमिक स्पेशल ट्रेन्सबाबत बोलताना रेल्वे मंत्री म्हणाले की, हे मिशन आमच्यासाठी आव्हानात्मक होते, मात्र यामध्ये सरकार यशस्वी झाले आहे. पीयूष गोयल पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन या मिशनचे मॉनिटरिंग करत आहेत. यासंदर्भात गोयल यांनी ट्विट देखील केले आहे, भारतीय रेल्वेने संचालित केलेल्या 2,050 ट्रेन्समधून आतापर्यंत 30 लाख कामगार त्यांच्या घरी पोहोचले आहेत, असं गोयल यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

संबंधित बातम्या

(हे वाचा- लॉकडाऊनमध्ये छोट्या व्यवसायिकांसाठी खूशखबर! फेसबुक सुरू करणार ‘ऑनलाइन दुकान’) पीयूष गोयल पुढे म्हणाले की, श्रमिक ट्रेन चालवण्यासाठी उत्तर प्रदेश सरकार विशेष सक्रिय होते. मध्य प्रदेश आणि बिहारमध्ये देखील चांगले काम झाले. ओडिसा आणि बंगालमधूल श्रमिक स्पेशल ट्रेन्सची मागणी होती मात्र अम्फानमुळे ही सेवा या राज्यांसाठी थांबण्यात आली आहे. 23 मे नंतर पुन्हा या राज्यांसाठी श्रमिक ट्रेन्स चालवण्यात येतील असंही गोयल म्हणाले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या