JOIN US
मराठी बातम्या / मनी / उद्या PNB कडून खरेदी करा स्वस्त प्रॉपर्टी, 18305 मालमत्तांसाठी लावता येईल बोली

उद्या PNB कडून खरेदी करा स्वस्त प्रॉपर्टी, 18305 मालमत्तांसाठी लावता येईल बोली

पंजाब नॅशनल बँक (Punjab National Bank) 18300 पेक्षा जास्त रेसिडेन्शिअल, कमर्शिअल, इंडस्ट्रिअल आणि अॅग्रीकल्चरल प्रॉपर्टीची विक्री करत आहे. तुम्ही देखील यामध्ये सहभागी होऊ शकता.

जाहिरात

PNB Bank Alert!

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 11 ऑगस्ट: जर तुमची घर, दुकान किंवा शेतीसंबंधित जमीन घेण्याचा विचार असेल तर तुमच्याकडे एक चांगली संधी आहे. पंजाब नॅशनल बँक (Punjab National Bank) 18300 पेक्षा जास्त रहिवासी, व्यापारी, औद्योगिक आणि कृषी संबंधित मालमत्तेची विक्री करत आहे. ही सर्व प्रॉपर्टी मेगा ई-ऑक्शन अंतर्गत (PNB Mega E-Auction) विक्री केली जात आहे. पीएनबी मेगा ई-ऑक्शन 12 ऑगस्ट रोजी  होणार आहे. अर्थात उद्या तुम्हाला स्वस्त प्रॉपर्टी खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. या लिलावात रेसिडेन्शिअल, कमर्शिअल, इंडस्ट्रिअल आणि अॅग्रीकल्चरल प्रॉपर्टीची विक्री केली जात आहे. तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार यामध्ये बोली लावू शकता. पीएनबीने केलं आहे ट्वीट पीएनबीने त्यांच्या ट्वीटमध्ये ई-ऑक्शनसंदर्भात माहिती दिली आहे. बँकेने असं म्हटलं आहे की, स्वस्त दरात प्रॉपर्टी खरेदी करण्याची चांगली संधी. बँकेने एक व्हिडीओ जारी करत स्वस्त घर खरेदी करण्याबाबत एक संदेशही दिला आहे. हे वाचा- Gold Price Today: खूशखबर! 11000 रुपयांनी स्वस्त झालं सोनं,चांदीमध्येही मोठी घसरण किती आहे प्रॉपर्टी? »रेसिडेन्शिअल-13598 »कमर्शिअल-3045 »इंडस्ट्रिअल-1558 »कृषी-104 »एकूण- 18305 कशाप्रकारे कराल रजिस्ट्रेशन? प्रॉपर्टीसाठी रजिस्ट्रेशन करण्यासाठी https://www.mstcecommerce.com/auctionhome/ibapi/index.jsp या लिंकवर भेट द्या. याशिवाय अधिक माहितीसाठी ई-विक्री पोर्टलला भेट देऊ शकता-https://ibapi.in/ हे वाचा- 24 दिवस पेट्रोल-डिझेलचे भाव स्थिर, कच्च्या तेलाचे दर घटूनही परिणाम नाही बोली लावण्यासाठी पूर्ण कराव्या लागतील या अटी -बिडरला आपल्या मोबाईल नंबर आणि Email ID चा वापर करुन E-Auction प्लॅटफॉर्मवर रजिस्ट्रेशन करावं लागेल. -त्यानंतर बिडरला KYC डॉक्युमेंट अपलोड करावे लागतील. KYC डॉक्युमेंट E-Auction सर्विस प्रोवाइडर द्वारा व्हेरिफिकेशन केलं जाईल. यासाठी कमीत-कमी दोन वर्किंग डे इतका वेळ लागू शकतो. -त्यानंतर E-Auction प्लॅटफॉर्मवर जनरेट झालेल्या चालानचा वापर करुन अमाउंट ट्रान्सफर करावी लागेल. यासाठी NEFT किंवा ऑनलाईन-ऑफलाईन ट्रान्सफरचाही वापर करता येऊ शकतो. -इच्छुक रजिस्टर करणारे पहिला, दुसरा आणि तिसरा टप्पा पूर्ण केल्यानंतर E-Auction प्लॅटफॉर्मवर ऑनलाईन बोली लावू शकतात. बँकेकडून अनेकदा केला जातो लिलाव ज्या प्रापर्टीच्या मालकांनी त्या जागेचं कर्ज फेडलं नसेल किंवा एखाद्या कारणाने ते कर्ज देऊ शकत नसतील, त्या सर्वांची प्रापर्टी बँकेद्वारा जप्त केली जाते. बँकांकडून वेळोवेळी अशा प्रॉपर्टीचा लिलाव केला जातो. या लिलावात बँक अशा प्रापर्टी विकून आपली रक्कम वसूल करुन घेतात. प्रापर्टी लिलावाबाबत अधिक माहितीसाठी https://ibapi.in/ या लिंकवर माहिती घेऊ शकता. E-Auction द्वारे प्रापर्टी खरेदी करायची असेल, तर बँकेत जाऊन प्रक्रिया आणि संबंधित प्रॉपर्टीबाबत माहिती घेता येईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या