JOIN US
मराठी बातम्या / मनी / दरमहा 55 रुपये जमा करून प्रत्येक महिन्याला मिळवा 3000, मोदी सरकारच्या योजनेचा 39 हजार जणांनी घेतला फायदा

दरमहा 55 रुपये जमा करून प्रत्येक महिन्याला मिळवा 3000, मोदी सरकारच्या योजनेचा 39 हजार जणांनी घेतला फायदा

मोदी सरकारने गेल्या वर्षी असंगठित कामगारांसाठी पंतप्रधान श्रम योगी योजनेची (Pradhan Mantri Shram Yogi Maandhan Yojana) सुरूवात केली होती. या योजनेसाठी आतापर्यत 39 लाख रजिस्ट्रेशन करण्यात आले आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 17 जुलै : कोरोनाच्या संकटळात केली गेलेली छोटीशी गुंतवणूक तुमच्या म्हातारपणाचा सहारा बनू शकते. जर तुम्ही या संकटकाळात मोदी सरकारच्या विशेष योजनेमध्ये दरमहा 55 रुपयांची गुंतवणूक करत आहात, तर तुम्हाला साठाव्या वर्षानंतर दर महिन्याला 3000 रुपये पेन्शन स्वरूपात मिळतील. मोदी सरकारने गेल्या वर्षी असंगठित कामगारांसाठी पंतप्रधान श्रमयोगी योजनेची (Pradhan Mantri Shram Yogi Maandhan Yojana) सुरूवात केली होती. या योजनेसाठी आतापर्यत 39 लाख रजिस्ट्रेशन करण्यात आले आहेत. या योजनेमध्ये असंगठित क्षेत्रामध्ये काम करणारी कोणतीही व्यक्ती जोडली जाऊ शकते. या व्यक्तीचे वय 18 ते 40 वर्षांदरम्यान असणे बंधनकारक आहे त्याचप्रमाणे त्याचे मासिक उत्पन्न 15000 पेक्षा कमी असणे गरजेचे आहे. (हे वाचा- आरोग्यपूर्ण आयुष्य जगण्यास मदत करणाऱ्या ICICI Lombard च्या ILTakeCare ॲपद्वारे ) या योजनेमध्ये वयवर्ष 60 नंतर दरमहा 3000 रुपये पेन्शन मिळवण्यासाठी कमीत कमी 500 रुपये आणि जास्तीत जास्त 200 रुपये महिन्याच्या महिन्याला भरावे लागतील. जर 18 व्या वर्षी तुम्ही या योजनेबरोबर जोडले गेलात तर तुम्हाला 55 रुपये प्रति महिना गुंतवणूक करावी लागेल, तेच जर तुम्ही 29 व्या वर्षी या योजनेशी जोडले गेलात तर प्रति महिना 100 रुपये आणि वयाच्या 40 व्या वर्षी जोडले गेलाक तर दर महा 200 रुपयाचे अंशदान तुम्हाला करावे लागेल. कसे सुरु कराल या योजनेत खाते? -पंतप्रधान श्रमयोगी मानधन पेन्शन योजनेमध्ये रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला जवळच्या CSC सेंटरमध्ये जावे लागेल -त्यानंतर हे खाते सुरु करण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड, बँक डिटेल्स (बचत किंवा जनधन खात्याची माहिती) द्यावे लागतील. यासाठी तु्म्हाला पासबुक/चेकबुक/बँक स्टेटमेंट द्यावे लागेल. (हे वाचा- या बँकांनी बदलले मिनिमम बॅलन्स-व्यवहारासंदर्भातील नियम, 1 ऑगस्टपासून लागू होणार) -तुमची माहिती संबधित अधिकाऱ्यांनी भरून घेतल्यानंतर तुम्हाला मासिक किती पैसे भरावे लागतील याची माहिती मिळेल -त्यानंतर सुरुवातीचे योगदान तुम्हाला रोख रकमेच्या स्वरूपात द्यावे लागेल. -त्यानंतर तुमचे खाते बनवण्यात येईल आणि तुम्हाला श्रमयोगी कार्ड देखील मिळेल. -1800 267 6888 या टोल फ्री क्रमांकावर तुम्ही योजनेची अधिक माहिती मिळवू शकता (हे वाचा- 70 लाख शेतकऱ्यांना छोटी चूक पडली महागात!मिळाले नाहीत मोदी सरकारच्या योजनेचे पैसे) जर तुम्ही एखाद्या महिन्याचे योगदान भरले नाही तर त्या रकमेबरोबर व्याज देखील द्यावे लागेल. त्यानंतर सामान्य पद्धतीने तुमचे योगदान सुरू होईल. जर या योजनेशी जोडले गेल्याच्या तारखेनंतर 10 वर्षांच्या आतमध्ये पैसे काढायचे असतील तर तुम्हाला तुमचे पैसे बचत खात्य़ाच्या व्याजदराप्रमाणे परत करण्यात येतील

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या