मुंबई: पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (पीपीएफ) ही सुरक्षित गुंतवणूक योजना आहे. भरघोस परतावा आणि करबचत यामुळे पीपीएफमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. पीपीएफ खात्यात जमा झालेल्या रकमेवर सरकार 7.1 टक्के व्याज सरकारकडून मिळतं. पोस्ट ऑफिस किंवा कोणत्याही बँकेच्या शाखेत पीपीएफ खाते उघडता येतं. वर्षाला पीपीएफ खात्यात किमान 500 ते दीड लाख रुपयांपर्यंतची रक्कम जमा करता येते. ही योजना EEE कॅटेगरीमध्ये येते. दरवर्षी जमा होणारी रक्कम, या रकमेवर दरवर्षी मिळणारे व्याज आणि मॅच्युरिटीच्या वेळी मिळणारी संपूर्ण रक्कम करमुक्त असते. पीपीएफचा लॉक-इन कालावधी 15 वर्षांचा आहे. पैशांची गरज भासल्यास पीपीएफ खात्यातून 15 वर्षांपूर्वीही काही रक्कम काढता येते. स्कीम सुरु केल्यापासून 15 व्या वर्षापूर्वी खात्यातून पैसे काढायचे असतील किंवा ते बंद करायचे असतील तर अर्धवट पैसे काढण्यासाठी काही अटी पाळाव्या लागतील. 15 वर्षांनंतर खात्यात जमा झालेली संपूर्ण रक्कम काढता येते.
PPF खातं कितीवेळा एक्सटेंड करता येतं खातं? काय नियम पाहामनीकंट्रोलने दिलेल्या वृत्तानुसार पीएफ खातेधारक पीपीएफ खात्यातून 50 टक्के रक्कम सातव्या वर्षी काढू शकता. पीपीएफ खाते पहिल्या 6 वर्षांसाठी पूर्णपणे लॉक असतं तुम्हाला त्यातून पैसे काढता येत नाहीत. जर एखाद्या व्यक्तीला आर्थिक वर्ष 2020-2021 मध्ये गुंतवणूक सुरू करायची असेल तर तो आपत्कालीन परिस्थितीत 2025-2026 नंतरच पैसे काढू शकतो. मुदतपूर्व पैसे काढले तरी कोणताही कर भरावा लागत नाही. पीपीएफ अकाऊंटच्या मॅच्युरिटीआधीच खातेदाराचा मृत्यू झाला तर ही 7 वर्षांची अट खातेदाराच्या नॉमिनीला लागू होत नाही. नॉमिनी कधीही पैसे काढू शकतो. आधी बंद करता येतं का खातं? काही परिस्थितींमध्ये 15 वर्षांचा कालावधी पूर्ण होण्याआधी तुमचं पीपीएफ अकाऊंट बंद करता येतं. पीपीएफ विड्रॉव्हल रुल्स 2021 नुसार खातेदार किंवा अवलंबितांना कोणताही जीवघेणा आजार असल्यास किंवा उच्च शिक्षणासाठी पैशांची आवश्यकता असल्यास पीपीएफ खाते मुदतीपूर्वी बंद केले जाऊ शकते. मॅच्युरिटी पिरियडच्या आधी बंद केल्यास खाते उघडण्याच्या तारखेपासून ते क्लोजिंग डेटपर्यंत 1 टक्के व्याज कापले जाते.
PFF खात्यावर लोन घ्यायचं, किती मिळतं आणि काय आहेत नियम?पीपीएफ खात्यातून वेळेआधी पैसे काढण्यासाठी फॉर्म सी जमा करावा लागतो. हा फॉर्म पोस्ट ऑफिस आणि बँकेत मिळतो. फॉर्ममध्ये तुम्हाला अकाउंट नंबर आणि तुम्हाला काढायची रक्कम भरावी लागते. पासबुकसह फॉर्म सबमिट करावा लागेल. ही रक्कम थेट तुमच्या बचत खात्यात जमा होईल, किंवा डिमांड ड्राफ्टच्या माध्यमातूनही तुम्ही ती घेऊ शकता.