आयुष्यात तुम्ही नोकरी करा किंवा व्यवसाय भविष्याची चिंता जर दूर करायची असेल तर PPF हा सर्वोत्तम पर्याय आहे. टॅक्समधून देखील याला सूट मिळते. पोस्ट ऑफिस किंवा बँक दोन्ही पैकी एका ठिकाणी तुम्हाला PPF खातं उघडता येतं.
साधारण 15 वर्षांसाठी तुम्ही PPF खातं उघडू शकता. यावर सरकारकडून 7.1 टक्के व्याजदर दिलं जातं. खात्याला लॉकिंग कालावधी निश्चित केला जातो. तुम्हाला जर रक्कम काढायची असेल तर तुम्ही 10 वर्षांनी ठराविक रक्कम काढू शकता.
15 वर्षांसाठी याचा लॉकिंग कालावधी आहे. तुम्ही हे खातं आणखी 5 वर्ष वाढवू शकता. या खात्याची मुदत संपण्याआधी तुम्ही त्यासाठी रिक्वेस्ट करून आणखी 5 वर्ष वाढवून घेता येतं.
तुम्ही एकदा 5 वर्ष वाढली की तुम्हाला पुन्हा एकदा 5 वर्ष वाढवण्याची संधी दिली जाते. म्हणजेच 15 वर्षांच्या लॉकिंग कालावधीनंतर 5-5 अशी दोन वेळा ही मुदत वाढवण्याची मुभा दिली जाते. एकूण 25 वर्ष हे तुमचं खातं राहील.
तुम्हाला जर खातं एक्सटेंड करायचं असेल तर मुदत संपण्याच्या एक वर्ष आधी याबाबत अर्ज करून बँक किंवा पोस्टाला कळवावं लागेल. त्यानंतर प्रक्रिया झाली की तुमचं खातं चालू राहील.
तुम्ही जर खात्यावर नियमित पैसे भरले नाहीत तर आहे त्यावर व्याज मिळत राहातं. दीड लाख रुपयांपर्यंत तुम्ही वर्षाला पैसे भरू शकता.