मराठी बातम्या /बातम्या /मनी /

PFF खात्यावर लोन घ्यायचं, किती मिळतं आणि काय आहेत नियम?

PFF खात्यावर लोन घ्यायचं, किती मिळतं आणि काय आहेत नियम?

संग्रहित फोटो

संग्रहित फोटो

गरज पडल्यास पीपीएफ खात्यातून कर्ज घेण्याची किंवा काही पैसे काढण्याची सूटही मिळते.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Kranti Kanetkar

मुंबई : तुम्हाला जर लोन घ्यायचं असेल तर पर्सनल लोन घेण्यापेक्षा PPF खात्यावर तुम्ही लोन घेऊ शकता. मोठ्या कामासाठी मोठी बचत जमा करण्यासाठी पीपीएफ खाते उपयुक्त ठरतं. गरज पडल्यास पीपीएफ खात्यातून कर्ज घेण्याची किंवा काही पैसे काढण्याची सूटही मिळते.

पीपीएफ खात्यावर लोनही घेता येतं. किती लोन मिळतं, त्यावर किती व्याजदर भरावं लागतं याबाबत सगळी माहिती आज जाणून घेऊया. पर्सनल लोनवर साधारण 10.25 टक्के व्याजदर भरावं लागतं. पण तेच जर पीपीएफवर लोन काढलं तर व्याजदरही कमी भरावं लागतं.

पीपीएफवर किती लोन मिळतं?

खात्यातील रकमेच्या २५% पर्यंत तुम्ही लोनसाठी अर्ज करू शकता. पीपीएफ खात्यातून मिळणारे कर्ज तुमच्या खात्यातील शिल्लक रकमेच्या २५% पेक्षा जास्त असू शकत नाही. ३१ मार्चच्या शेवटच्या दिवशीही खात्यातील शिल्लक तपासली जाणार आहे. गेल्या आर्थिक वर्षाचा तो शेवटचा दिवस आहे.

जर तुम्हाला या वर्षासाठी कर्ज हवं असेल तर तुम्हाला गेल्यावर्षी जेवढी खात्यात रक्कम होती, त्या रकमेच्या 25 टक्के लोन मिळणार आहे. त्यासाठी तुम्ही अर्ज करू शकता. तुम्हाला लोन मिळून जाईल. मात्र लोन मुदतीत पूर्ण करणं देखील बंधनकारक आहे.

किती व्याजदर लागेल?

सर्वात महत्त्वाचं म्हणजे PPF खात्यावर लोन घेतल्यानंतर त्यावर असलेल्या व्याजदरापेक्षा केवळ १ टक्का व्याजदर तुम्हाला जास्त भरावं लागतं. म्हणजेच पीपीएफ खात्यावर 7.1 टक्के व्याज मिळत असेल तर पीपीएफ कर्जावर 8.1 टक्के व्याज द्यावं लागेल. हे वैयक्तिक कर्जापेक्षा स्वस्त आहे. या व्याजदराची तुलना तुम्ही बँकेच्या पर्सनल लोनच्या दराशी केली कमी आहे हे तुम्हालाही जाणवेल. साधारणपणे बँका वैयक्तिक कर्जासाठी १०-१५ टक्के दर आकारतात.

कर्ज फेडण्यासाठी किती अवधी दिली जातो?

पीपीएफमधून घेतलेल्या कर्जाला फेडण्यासाठी तुम्हाला साधारण ३६ महिन्यांचा अवधी दिला जातो. या कालावधीमध्ये तुम्हाला लोन फेडायचं असतं.

कितीवेळा घेऊ शकतो लोन?

तुम्ही आर्थिक वर्षातून एकदाच कर्जासाठी अर्ज करू शकता. त्यापूर्वी घेतलेले कर्ज फेडले असले तरी त्याच आर्थिक वर्षात नवे कर्ज घेता येत नाही. आर्थिक वर्षात किमान ५०० रुपये जमा करता येत नसतील, तर पुढील आर्थिक वर्षात त्यातून कर्ज घेता येणार नाही.

First published:

Tags: Money, Open ppf account, PPF