SBI की पोस्ट ऑफिस? FD वर मिळवा10 लाखांचा रिटर्न, फक्त करावी लागेल 'ही' एक गोष्ट
मुंबई : करोडपती व्हावं असं प्रत्येकाला वाटतं पण हे सगळ्यांनाच जमतं असं नाही. थेंबे थेंबे तळे साचे तसं प्रत्येक रुपयाचा योग्य वापर आणि गुंतवणूक करून तो कसा वाढेल याचं गणित ज्याला जमतं तो यामध्ये यशस्वी होतं. तुम्हालाही कमी वयात करोडपती होण्याची संधी आहे. त्यासाठी तुम्हाला या स्कीममध्ये पैसे गुंतवायचे आहेत. तुम्ही अगदी ५०० रुपयांपासून ते दीड लाख रुपयांपर्यंत यामध्ये पैसे गुंतवू शकतात. गुंतवणूक म्हटलं की टॅक्स भरायची कटकटही आली. पण या योजनेत गुंतवणूक केली तर तुम्हाला टॅक्समधूनही सूट आहे. दुसरं म्हणजे शंभरटक्के रिटर्न्स मिळणार आणि FD पेक्षा जास्त मिळणार कारण ही सरकारी योजना आहे. फक्त एकदा भरलेले पैसे तुम्ही काढू शकत नाही. त्यामुळे या योजनेत तुम्ही डोळे झाकून पैसे गुंतवू शकता. या योजनेत जर तुम्ही न चुकता २५ वर्ष पैसे गुंतवले तर तुम्ही नक्की करोडपत होणार. या योजनेवर ७.१ टक्के व्याज मिळतं. योजनेत गुंतवणूक केली तर तुम्हाला टॅक्समधूनही सूट मिळू शकते. पीपीएफमधील व्याजाचं कॅल्यक्युलेशन प्रत्येक वर्षाला होतं.तीन महिन्यांनी त्याचा आढावा घेतला जातो. PPF खात्याची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे न्यायालयाचा कोणताही आदेश, कर्ज किंवा इतर लायबिलिटीची स्थिती असेल तरीही ते जप्त केले जाऊ शकत नाही. ऑक्टोबर महिन्यात 21 दिवस बंद बँक, वाचा तुमच्या भागातील सुट्ट्यांची यादी
यावर किती व्याजदर मिळणार याचा निर्णय केंद्र सरकार घेतं. तुम्ही याशिवाय सुकन्या समृद्धी योजना आणि सीनियर सीटिजन स्कीममध्ये देखील गुंतवणूक करू शकता. PPF हा पर्याय युवकांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांसाठी असतो. त्याला वयोमर्यादा नाही. सोलापुरातील बँकेचा परवाना रद्द, तुमची बँक बुडली तर तुम्हाला किती पैसे मिळणार? पीपीएफमध्ये कोणीही गुंतवणूक करू शकतो. हे खाते कोणत्याही पोस्ट ऑफिस किंवा बँकेत उघडता येतं. आई-वडील मुलाच्या नावाने खातं उघडू शकता आणि त्याच्या नावे पैसे जमा करू शकतात. PPF खाते उघडण्यासाठी आणि गुंतवणूक करण्यासाठी फक्त 500 रुपयांपासून सुरुवात करता येते. खाते सक्रिय ठेवण्यासाठी, प्रत्येक आर्थिक वर्षात किमान 500 रुपये जमा करणे आवश्यक आहे. एका आर्थिक वर्षात वर्षाला जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये गुंतवले जाऊ शकतात.
महिन्याला किती गुंतवणूक | 15वर्षांपर्यत किती होणार व्याज | 20वर्षांपर्यंत व्याचाची रक्कम | 25 वर्षांपर्यंत व्याचाची रक्कम |
---|
12,500 | 39.82 लाख | 65.57 लाख | 1.02 करोड़ |
---|---|---|---|
10,000 | 31.85 लाख | 52.45 लाख | 81.76 लाख |
10,000 | 15.92 लाख | 26.23 लाख | 44.88 लाख |
3000 | 9.55 लाख | 15.73 लाख | 24.52 लाख |
2000 | 6.37 लाख | 10.49 लाख | 16.35 लाख |
1,000 | 3.18 लाख | 5.24 | 8.17 लाख |
प्रत्येक महिन्याला तुम्ही जर १२ हजार ५०० रुपये गुंतवले तर २५ वर्षात व्याजासकट १ कोटी रक्कम तुमच्याकडे होते. १० हजार महिन्याला २५ वर्षांसाठी गुंतवले तर ही रक्कम ८१.७६ लाख रुपये होते. किमान ५ वर्षांचा लॉकिंग पीरिएड असतो. ज्यामध्ये तुम्हाला पैसे काढता येत नाही. त्यानंतर दोन फॉर्मभरून तुम्हाला पैसे काढता येतात. १५ वर्षांआधी तुम्ही केव्हाही पैसे काढले तरी तुम्हाला रकमेच्या एक टक्के दंड भरावा लागतो.
Personal Finance : Cancel Cheque देताना तुम्ही करताय का ही चूक?PPF Account मध्ये तुम्ही तुमची बचत सुरू केल्यावर तुम्हाला एक वर्षानंतर लोन मिळू शकतं. ५ वर्ष पूर्ण होईपर्यंत तुम्ही लोक घेऊ शकता. जमा रकमेवर तुम्हाला २५ टक्के लोन काढता येतं. या व्याजाला तुम्हाला दोन महिन्यांच्या इंस्टॉलमेंटवर भरावं लागतं.