नवी दिल्ली, 21 ऑक्टोबर : प्रत्येकाला अशा ठिकाणी पैसे गुंतवायचे असतात, जिथून त्याला चांगला परतावा मिळतो तसेच त्याचे पैसे सुरक्षित असतात. अनेक गुंतवणूकदार अशा गुंतवणूक योजनेला प्राधान्य देतात ज्यामध्ये पैसे गमावण्याचा धोका नाही. यामुळेच भारतीय पोस्ट ऑफिसच्या योजना लोकांना खूप आवडतात. पोस्ट ऑफिसद्वारे चालवली जाणारी वेळ ठेव योजना ही अशीच एक उत्तम योजना आहे. नेमकी काय आहे ही योजना - या योजनेला पोस्ट ऑफिस एफडी असेही म्हणतात. अलीकडेच, सरकारने टाइम डिपॉझिट योजनेच्या व्याजदरात 30 आधार पॉइंट्सने वाढ केली होती. आता या योजनेत गुंतवणूकदाराला वार्षिक 6.7 पर्यंत व्याज दिले जात आहे. या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये गुंतवणूकदाराला अल्पकालीन आणि दीर्घकालीन गुंतवणूक करण्याची संधी दिली जाते. या योजनेत एखादी व्यक्ती 1 वर्ष, 2 वर्षे, 3 वर्षे आणि 5 वर्षांसाठी पैसे जमा करू शकते. कोण खोलू शकतो खाते? पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट स्कीममध्ये कोणताही भारतीय नागरिक आपले खाते उघडू शकतो. एवढेच नाही तर 3 प्रौढ व्यक्ती एकत्रित खाते देखील उघडू शकतात. पालक 10 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांच्या नावे टाइम डिपॉझिट खाते देखील उघडू शकतात. 1,000 रुपये गुंतवूनही खाते उघडता येते. 6.7 पर्यंत व्याज - पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट्समध्ये वेगवेगळ्या कालावधीच्या गुंतवणुकीसाठी वेगवेगळे व्याज दर निर्धारित केले आहेत. जर एखाद्या गुंतवणूकदाराने या योजनेत 5 वर्षांसाठी पैसे जमा केले तर त्याला वार्षिक 6.7 टक्के दराने व्याज मिळेल. गुंतवणूकदाराला तीन वर्षांच्या मुदत ठेवीवर 5.8 टक्के दराने व्याज दिले जाईल. तसेच 2 वर्षांच्या मुदत ठेवीवर 5.7 टक्के व्याज दिले जात आहे. सर्वात कमी व्याज म्हणजेच 5.5 टक्के एक वर्षाच्या मुदत ठेवीवर दिले जात आहे. हेही वाचा - GST Return संदर्भात मोठी अपडेट, सरकारकडून दिलासा मिळण्याची शक्यता करात सूटही मिळेल - पोस्ट ऑफिसमध्ये 5 वर्षांच्या कालावधीसह टाइम डिपॉझिट खात्यात गुंतवलेल्या रकमेला आयकर कायदा, 1961 च्या कलम 80C अंतर्गत कर सवलतीचा लाभ देखील मिळतो. या मुदतीपेक्षा कमी ठेवींवर कर लाभ माफ केला जात नाही. टाइम डिपॉझिटच्या मॅच्युरिटीपूर्वीही पैसे काढता येतात, पण दंड आकारला जातो.