JOIN US
मराठी बातम्या / मनी / अमेरिकेतून एक गुड न्यूज अन् या कंपनीचे शेअर्स सुसाट; एकाच महिन्यात गुंतवणुकदारांचे पैसे डबल

अमेरिकेतून एक गुड न्यूज अन् या कंपनीचे शेअर्स सुसाट; एकाच महिन्यात गुंतवणुकदारांचे पैसे डबल

कंपनीला अमेरिकेतून निर्यातीची मोठी ऑर्डर मिळाल्याचं वृत्त समोर येताच या मल्टिबॅगर स्टॉकची खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदार तुटून पडले आहेत. यामुळेच हा शेअर गेल्या 7 ट्रेडिंग सत्रांपासून अप्पर सर्किटला जातोय

जाहिरात

संग्रहित फोटो

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 15 ऑक्टोबर : एखाद्या कंपनीच्या शेअर साठी एक चांगली बातमीसुद्धा खूप फायद्याची ठरू शकते. पूजा वेस्टर्न मेटॅलिक्स शेअरच्या बाबतीतही असचं घडलं आहे. कंपनीला अमेरिकेतून निर्यातीची मोठी ऑर्डर मिळाल्याचं वृत्त समोर येताच या मल्टिबॅगर स्टॉकची खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदार तुटून पडले आहेत. यामुळेच हा शेअर गेल्या 7 ट्रेडिंग सत्रांपासून अप्पर सर्किटला जातोय. विशेष म्हणजे, हा स्मॉल कॅप स्टॉक पहिल्यांदाच गुंतवणूकदारांना नफा देत आहे, असे अजिबात नाही. तर, गेल्या 2 वर्षांत या शेअरनं गुंतवणूकदारांना सुमारे 400 टक्के परतावा दिलाय. असं काय घडलं की ‘या’ कंपनीच्या शेअर्सनं गुंतवणूकदारांना बनवलं कोट्यधीश! काल, शुक्रवार (14 ऑक्टोबर 2022) रोजी शेअर बाजार उघडल्यानंतर थोड्याच वेळात पूजा वेस्टर्न मेटालिक्सचा स्टॉक अपर सर्किटपर्यंत गेला. शुक्रवारी हा शेअर 4.95 टक्क्यांच्या वाढीसह 59.35 रुपयांवर बंद झाला. पूजा वेस्टर्न मेटालिक्स लिमिटेड ही नॉन-फेरस मेटल स्क्रॅप, ब्रास प्लंबिंग फिटिंग्ज, ब्रास सॅनिटरी फिटिंग्जची एक आघाडीची उत्पादन आणि निर्यात करणारी कंपनी आहे. बीएसई सूचीबद्ध असणाऱ्या पूजा वेस्टर्न मेटालिक्स लिमिटेडचं सध्याच मार्केट कॅप 60 कोटी रुपये आहे. या शेअरचे बुक व्हॅल्यू प्रति शेअर 11 च्या थोडं वर आहे. बीएसईवर या शेअरचा 52 आठवड्यांतील उच्चांक 86.70 रुपये, तर 52 आठवड्यांतील नीचांक 22.30 रुपये आहे. दोन वर्षांपासून देतोय मल्टीबॅगर रिटर्न गेल्या दोन वर्षांत हा बीएसई लिस्टेड स्टॉक 11 रुपयांवरून 59.35 रुपयांपर्यंत वाढलाय. या शेअरनं गेल्या दोन वर्षात गुंतवणूकदारांना 400 टक्क्यांहून अधिक रिटर्न दिलाय. गेल्या 5 सत्रांचा विचार केला, तर याकाळात हा शेअर 21.25 टक्क्यांनी वाढलाय. याशिवाय गेल्या एका महिन्यात हा मल्टिबॅगर स्टॉक 106.79 टक्के वाढला आहे. 6 महिन्यांचा विचार केल्यास, याकाळात हा स्टॉक सुमारे 45 टक्के वाढलाय. 2022 मध्ये या स्टॉकनं गुंतवणूकदारांना 25.74 टक्के परतावा दिला. गेल्या एका वर्षात या शेअरमध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना 101 टक्के नफा मिळालाय. Financial Planning: ‘या’ वयापासूनच करा गुंतवणूकीला सुरुवात, चाळीशीच्या आतच व्हाल करोडपती एका महिन्यात झाले पैसे दुप्पट पूजा वेस्टर्न मेटालिक्सच्या शेअर्सनं केवळ 1 महिन्यात गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केलेत. जर एखाद्या गुंतवणूकदारानं महिन्यापूर्वी या शेअरमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असतील, किंवा त्याच्याकडे 1 लाख रुपयांच्या शेअर असतील, तर आज त्याच्या गुंतवणुकीचं मूल्य 206,794 रुपये झालं आहे. त्याचप्रमाणे दोन वर्षांपूर्वी या शेअरमध्ये 1 लाख गुंतवणूक केली असेल, तर आज त्या गुंतवणुकीचं मूल्य 539545 झाले आहे. याचाच अर्थ, या शेअरने दोन वर्षांत गुंतवणूकदारांना त्यांच्या पैशात साडेपाच पटीनं वाढ करून दिली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या