JOIN US
मराठी बातम्या / मनी / IPO येण्याआधी Paytm मध्ये उलथापालथ सुरूच! प्रेसिडंट अमित नय्यर यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांचा राजीनामा

IPO येण्याआधी Paytm मध्ये उलथापालथ सुरूच! प्रेसिडंट अमित नय्यर यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांचा राजीनामा

आयपीओ येण्याआधी पेटीएममध्ये (Paytm) मोठी उलथापालथ झाली आहे. कंपनीचे प्रेसिडंट अमित नय्यर यांच्यासह अनेक टॉपच्या अधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्याने खळबळ उडाली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 10 जुलै: पेटीएमचा (Paytm) इनिशिअल पब्लिक ऑफर अर्थात आयपीओ (IPO) येण्याआधीच  या दिग्गज डिजिटल पेमेंट (Digital Payment Company Paytm) कंपनीमध्ये मोठी उलथापालथ झाली आहे. जुलै अखेरीस कंपनी आयपीओसाठी अर्ज करणार आहे आणि त्यापूर्वीच कंपनीच्या अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे. मीडिया अहवालांच्या मते, पेटीएमच्या प्रेसिडंट यांच्यासह अनेक वरच्या पदावरील अधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे. यामध्ये चीफ एचआर ऑफिसर रोहित ठाकूर (Rohit Thakur) यांचा देखील समावेश आहे. अमित नय्यर (Amit Nayyar) यांनी गेल्या महिन्यात त्यांच्या पदाचा राजीनामा दिला होता. ते पेटीएमच्या फायनान्शिअल सर्व्हिसेस डिव्हिजनचे हेड होते. नय्यर यांनी ऑगस्ट 2019 मध्ये कंपनी जॉइन केली होती. नय्यर यांच्यावर मोठी जबाबदारी होती, ते लेंडिंग, इन्शुरन्स, डिस्ट्रीब्यूशन, वेल्थ मॅनेजमेंट आणि स्टॉक ब्रोकिंगचा बिझनेस पाहत होते. पेटीएमशी जोडले जाण्याआधी ते अॅडव्हायजरी फर्म  Arpwood Capital मध्ये कार्यरत होते. याठिकाणी त्यांच्याकडे मॅनेजमेंट डायरेक्टर पदाची जबाबदारी होती. पेटीएमच्या बोर्डाने नय्यर यांचा राजीनामा स्विकारला आहे. हे वाचा- ‘या’ कर्मचाऱ्यांसाठी Good News, दरवर्षी मिळणार 10 दिवसांची Surprise सुट्टी! गेल्या महिन्यातच कंपनीचे चीफ एचआर ऑफिसर रोहित ठाकूर यांनी देखील राजीनामा दिला होता. ते पेटीएममध्ये केवळ 18 दिवस कार्यरत होते. पेटीएम मधून राजीनामा देणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये केवळ ठाकूर आणि नय्यर यांचा समावेश नाही आहे, तर अनेक बड्या अधिकाऱ्यांनी कंपनीला यावर्षी रामराम केला आहे. यावर्षी फेब्रुवारीमध्ये जसकरण सिंह यांनी पेटीएमच्या हेड ऑफ मार्केटिंग पदावरुन राजीनामा दिला होता. ते कंपनीमध्ये 6 वर्षांसाठी कार्यरत होते. पेटीएम ही कंपनी सोडल्यानंतर ते Xiaomi India च्या चीफ मार्केटिंग ऑफिसर पदावर रुजू झाले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या