JOIN US
मराठी बातम्या / मनी / Demat Account ओपन केल्यानंतर 'या' गोष्टी तुम्हाला माहित असायलाच हव्यात

Demat Account ओपन केल्यानंतर 'या' गोष्टी तुम्हाला माहित असायलाच हव्यात

प्रत्येक terms चा योग्य अर्थ माहीत असणे आवश्यक आहे. या terms एकदा समजल्या की गुंतवणूक करणे सोपे होईल.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई : Demat अकाऊंट ओपन केल्यानंतर आपल्याला त्यातील काही गोष्टी समजत नाहीत आणि गोंधळ उडतो त्यात तुम्ही माहीत नसताना shares ची खरेदी-विक्री केली तर तुमच आर्थिक नुकसान होऊ शकत, त्यामुळे प्रत्येक terms चा योग्य अर्थ माहीत असणे आवश्यक आहे. या terms एकदा समजल्या की गुंतवणूक करणे सोपे होईल. बुल मार्केट (Bull Market ) शेअर मार्केट जेव्हा वर जात असतो म्हणजे तो तेजीत असतो तेव्हा त्यास बुल मार्केट म्हटलं जातं. “एखाद्या शेअर संदर्भात मी बुलीश आहे” असं जेव्हा कोणी म्हणतं तेव्हा तो शेअर येत्या काळात वधारेल अर्थात त्याची किंमत वाढेल असा त्या व्यक्तीचा अंदाज आहे. बेअर मार्केट (Bear Market ) बुल मार्केटच्या अगदी विरुद्ध. म्हणजे जेव्हा मार्केट घसरण अनुभवत असतो म्हणजे मंदीत असतो तेव्हा त्याला बेअर मार्केट असं म्हणतात. “एखाद्या शेअर संदर्भात मी बेअरीश आहे” असं जेव्हा कोणी म्हणतं तेव्हा तो शेअर येत्या काळात घसरणार आहे म्हणजेच त्याची किंमत कमी होणार असा त्या व्यक्तीचा अंदाज आहे. ब्लूचीप स्टॉक्स ( What is Blue chip Stocks ) अशा लार्ज कॅप कंपन्या ज्या आंतराष्ट्रीय स्तरावर त्यांची विश्वासाहर्ता, गुणवत्ता आणि आर्थिक स्थैर्यासाठी ओळखल्या जातात. अशा कंपन्यां ज्यामध्ये केलेली गुंतवणूक तुलनेत सुरक्षित समजली जाते. भारतात रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँक, इन्फोसिस , टीसीएस सारख्या कंपन्या ब्लूचीप स्टॉक्स म्हणून ओळखल्या जातात. हे वाचा-असा करा तुमच्या गुंतवणुकीचा श्रीगणेशा , जाणून घ्या डीमॅट खाते उघडण्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे एवरेज डाऊन करणे (averaging down stocks meaning ) समजा तुम्ही “अ” कंपनीचे 100 प्रत्येकी 20 रुपये दराने खरीदी केलेत आणि काही काळाने त्या शेअरची किंमत 15 रुपयांपर्यंत खाली आली मग त्यावेळी तुम्ही त्या शेअरचे आणखी 50 शेअर्स 15 दराने खरेदी केलेत. यामध्ये तुम्हाला एकूण शेअर्सची किंमत सरासरीने कमी लागू झाली. आता तुमच्या कडे 150 शेअर्स आहेत ज्यांची प्रती शेअर सरासरी किंमत आहे रु.18.33 कारण तुम्ही शेअरची किंमत खाली आली तेव्हा तुम्ही एवरेज डाऊन पद्धतीने पुन्हा खरेदी केली होती. डेरीव्हीटीव्ज (What is derivatives market) म्हणजेच फ्युचर एन्ड ऑप्शन ( F & O ). नेहमीच्या मार्केटमधील ट्रेडिंग प्रमाणे या प्रकारात सुद्धा ट्रेडिंग होत असते. म्हणजे मी नेहमीच्या मार्केटमधून रिलायन्सचे शेअर्स खरेदी करू शकतो तसेच मी F & O प्रकारातही रिलायन्समध्ये व्यवहार करू शकतो पण F & O मध्ये या स्टॉक्सना असलेली किंमत हि त्यांची स्वताची किंमत नसते तर त्या मूळ स्टॉक्सवरून घेतलेली ( Derived ) असते आणि म्हणूनच यांना डेरीव्हीटीव्ज असेही म्हणतात. या प्रकारालाच वायदे बाजार असेही म्हटले जाते. पोर्टफोलिओ ( Portfolio in Stock Market ) अर्थात शेअर मार्केटमधील तुमच्या गुंतवणुकीचा गोषवारा. म्हणजेच तुमच्या डीमॅट खात्यात ( गुंतवणुकीच्या उद्देशाने ) असलेले शेअर्स. हे वाचा-Mutual Funds : डिमॅट अकाउंट म्हणजे काय? त्याचे प्रकार तुम्हाला माहिती आहेत का? रॅली ( What is Rally in stock market ) घसरणीच्या नंतर मार्केटमध्ये काही काळासाठी आलेल्या तेजीला सामान्यपणे रॅली असे म्हणतात. करेक्शन (What is correction in stock market) स्टॉक असो व स्टॉकमार्केट, अनेक सत्रांत असलेल्या तेजीने खरेदीचा जोर राहिल्यामुळे नंतर झालेली नफा निश्चिती तसेच त्या स्टॉक किंवा निर्देशांकाला आलेल्या अतिरिक्त मुल्यामुळे त्यात घसरण होऊन तो वाजवी मूल्याला येण्यासंदर्भात करेक्शन हि संज्ञा वापरली जाते. मार्केटमध्ये करेक्शन येणार असं कोणी म्हणत असेल तर याचा अर्थ सध्या मार्केट फुगलेलं असून त्यात घसरण संभवते असा त्या व्यक्तीचा अंदाज असतो . व्हॉल्युम ( what is Volume in stock Market ) एखाद्या स्टॉकमध्ये विशिष्ट कालावधीत किती संख्येने व्यवहार झाले. म्हणजे “अ” कंपनीच्या आज व्यवहार ( खरेदी – विक्री दोन्ही ) झालेल्या समभागांची संख्या 25 लाख आहे याचा अर्थ त्या कंपनीचा व्यवहाराचा तो व्हॉल्युम समजला जातो. व्हॉल्युमवरून एखाद्या कंपनीत असलेला गुंतवणूकदारांचं स्वारस्य जाणून घेता येतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या