50 वर्षांनंतर त्याच्या आरोग्याची जास्त काळजी घेण्याची गरज असते. वडीलांच्या शरीरात काही लक्षणं जाणवत असतील तर, त्याकडे लक्ष द्या.
नवी दिल्ली, 03 एप्रिल : विमा नियामक आणि विकास प्राधिकरण अर्थात आयआरडीएआयनं (IRDAI) देशातील सर्व विमा कंपन्यांना एक सरल पेन्शन योजना (Saral Pension scheme) सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. ही एक तत्काळ कार्यान्वित होणारी अॅन्युईटी योजना (Annuity) असून यात पॉलिसी घेतल्याबरोबर लगेच पॉलिसी धारकाला पेन्शन सुरू होईल. एक एप्रिलपासून सर्व आयुर्विमा कंपन्यांनी एक सरल पेन्शन योजना नावानं एक स्टँडर्ड पॉलिसी दाखल करावी अशी सूचना आयआरडीएनं 25 जानेवारी जारी केलेल्या परिपत्रकात दिली होती. कंपन्यांचे पेन्शनचे दर वेगवेगळे असू शकतील; पण या पेन्शन योजनेचे नाव सरल पेन्शन असेल असंही सांगण्यात आलं होतं. त्याआधी ज्या कंपनीची पॉलिसी असेल त्या कंपनीचे नाव लागेल असंही आयआरडीएनं स्पष्ट केलं होतं. कोणाला मिळणार सरल पेन्शन सरल पेन्शन योजनेचा लाभ 40 ते 80 वर्षांपर्यंतच्या व्यक्ती घेऊ शकतात. किमान वय 40 वर्षे तर कमाल वय 80 वर्षे आहे. दरमहा किंवा तिमाही, सहामाही आणि वार्षिक अशा प्रकारातही पेन्शन मिळू शकते. हे वाचा - सोने पे सुहागा! लग्नाच्या सिझनमध्ये सोनं आणखी स्वस्त; पाहा किती घसरणार GOLD RATE दर महिन्याचा पर्याय निवडला तर एक महिन्यानंतर पेन्शन मिळेल. तर तिमाही पर्यायात तीन महिन्यांनी, सहामाही पर्यायात सहा महिन्यांनी पेन्शन मिळेल. तर वार्षिक पर्याय निवडल्यानंतर एक वर्षाने पेन्शन मिळेल. किती गुंतवणूक करावी लागेल दर महिन्याला पेन्शन हवी असेल तर महिन्याला किमान एक हजार रुपये याप्रमाणे गुंतवणूक करावी लागेल, तर तिमाही पेन्शनसाठी महिन्याला तीन हजार प्रमाणे गुंतवणूक करावी लागेल. या योजनेअंतर्गत 5 लाख रुपयांपासून 25 लाख रुपयांपर्यंत विमा उतरवता येतो. 50 हजाराच्या पटीत ही रक्कम असेल. हे वाचा - सुकन्या समृद्धी, PPF, SCSS की KVP; बचत योजनांमधील कोणता पर्याय योग्य? पॉलिसी घेतल्यानंतर तुम्हाला एखादा गंभीर आजार झाला आणि उपचारांसाठी मोठ्या रकमेची गरज असेल तर या योजनेतून सर्व पैसे काढून घेता येतील. अशा गंभीर आजारांची यादी देण्यात आली असून, त्यापैकी एखादा आजार असेल तरच पॉलिसी सरेंडर करता येते. शंभर टक्के खरेदी मूल्य परतीची हमी या पेन्शन योजनेअंतर्गत मॅच्युरिटी लाभ मिळणार नाहीत; मात्र यात गुंतवणुकीची रक्कम पूर्ण परत मिळण्याचा पर्याय असेल. ही एक स्टँडर्ड इन्डिव्हिज्युअल इमीडिएट अॅन्युईटी योजना आहे. यामध्ये ग्राहकाला एकदाच गुंतवणूक करावी लागेल आणि त्याला लगेच पेन्शन मिळायला सुरुवात होईल, जी त्याला आयुष्यभर मिळेल. यामध्ये सिंगल लाईफ अॅन्युईटी आणि जॉईन्ट लाईफ अॅन्युईटी असे दोन पर्याय आहेत. कर्जाचीही सोय या योजनेअंतर्गत गरजेच्या वेळी कर्जही (Loan) मिळू शकते, तर पॉलिसी सरेंडर केल्यास जितकी रक्कम गुंतवली होती त्याच्या 95 टक्के रक्कम परत दिली जाईल.