JOIN US
मराठी बातम्या / मनी / निवृ्त्तीनंतर चांगली पेन्शन हवीय? पाहा PPF आणि NPS पैकी कोणती गुंतवणूक ठरेल फायदेशीर

निवृ्त्तीनंतर चांगली पेन्शन हवीय? पाहा PPF आणि NPS पैकी कोणती गुंतवणूक ठरेल फायदेशीर

Investment Tips: NPS चा रिटर्न हा फंड मॅनेजरच्या कामगिरीवर अवलंबून असतो कारण ही एक मार्केट लिंक्ड स्कीम आहे. दुसरीकडे, PPF आहे ज्यावर तुम्हाला निश्चित परतावा मिळतो.

जाहिरात

LICची जबरदस्त स्कीम! फक्त एकदा गुंतवणूक करा अन् आयुष्यभर पेन्शन मिळवा

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 8 सप्टेंबर : निवृत्तीनंतरच्या पेन्शनकडे वृद्धापकाळाची काठी म्हणून पाहिले जाते. प्रत्येकाला आपली पेन्शन महागाईवर मात देणारी असो असे वाटते. म्हणूनच ते वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करतात जेणेकरून सेवानिवृत्तीनंतर त्यांना चांगला पेन्शन निधी जमा करता येईल. तुम्‍हाला 2 पेन्‍शन योजनांबद्दल सविस्तरपणे सांगणार आहोत आणि यापैकी कोणती योजना तुमच्यासाठी चांगली आहे ते पाहू. राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS) आणि सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) या योजना आहेत. NPS चा रिटर्न हा फंड मॅनेजरच्या कामगिरीवर अवलंबून असतो कारण ही एक मार्केट लिंक्ड स्कीम आहे. दुसरीकडे, PPF आहे ज्यावर तुम्हाला निश्चित परतावा मिळतो. म्हणजेच ही योजना तुम्हाला शेवटी किती निधी देईल हे तुम्हाला कळेल. त्यांच्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. रेल्वे प्रवासात विंडो तिकीट सोबत न्यायला विसरले तर काय कराल? रेल्वेचा नियम वाचा राष्ट्रीय पेन्शन योजना NPS ही मार्केट लिंक्ड स्कीम आहे म्हणून जोखीम जास्त आहे. तुमच्या जोखमीच्या क्षमतेनुसार तुम्ही यामध्ये गुंतवणूक करू शकता. तुमच्याकडे तीन पर्याय आहेत. प्रथम, तुम्ही 75% रक्कम इक्विटीमध्ये गुंतवू शकता. दुसऱ्या पर्यायामध्ये तुम्ही १००% पैसे कॉर्पोरेट बाँडमध्ये गुंतवू शकता आणि तिसऱ्या पर्यायामध्ये तुम्ही सरकारी रोखे (बॉण्ड्स) खरेदी करू शकता. तुमचा परतावा तुमचा पैसा कुठे जात आहे यावर अवलंबून असेल. NPS मध्ये गुंतवणूक करण्याचे शेवटचे वय 50 वर्षे आहे. त्याच वेळी, त्याची मॅच्युरिटी वयाच्या 60 व्या वर्षी आहे. मॅच्युरिटी झाल्यावर तुम्हाला काही रक्कम एकरकमी मिळेल पण बाकीच्या रकमेतून तुम्हाला पेन्शन मिळेल. तुम्ही योजनेमध्ये जास्तीत जास्त 3 वेळा सशर्त पैसे काढू शकता. Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार? तज्ज्ञांकडून समजून घ्या दरकपातीला कोणते घटक ठरतील कारणीभूत पीपीएफ ही एक अतिशय सोपी योजना आहे. येथे रिटर्नसाठी कोणतेही पर्याय नाहीत. या योजनेत तुम्हाला 7-8 टक्के निश्चित परतावा मिळत राहतो. या व्याजदराचा प्रत्येक तिमाहीत आढावा घेतला जातो. सध्या पीपीएफवर 7.1 टक्के परतावा मिळत आहे. PPF 15 वर्षात मॅच्युअर होते. 7व्या वर्षी तुम्ही त्यातून काही पैसे काढू शकता. यासोबतच तुम्ही पीपीएफ खात्यावर कर्जही घेऊ शकता. तुम्हाला दोन्ही योजनांवर कर सवलतीचा लाभ मिळतो. तुमच्यासाठी काय चांगले आहे? जर तुम्हाला जोखीम घेऊन उच्च परतावा मिळवायचा असेल तर तुम्ही NPS मध्ये गुंतवणूक करावी. दुसरीकडे, जर तुम्हाला तुमचे पैसे सुरक्षित राहायचे असतील आणि नियमित परतावा मिळत असेल, तर तुमच्यासाठी PPF अधिक चांगले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या