JOIN US
मराठी बातम्या / मनी / Mumbai Mhada Lottery : मुंबईत घर घ्यायचं मग म्हाडाची ही संधी सोडू नका!

Mumbai Mhada Lottery : मुंबईत घर घ्यायचं मग म्हाडाची ही संधी सोडू नका!

Mumbai Mhada Lottery : म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार लॉटरीत सहभागी होण्यासाठी अर्जदारांना मोबाइल अॅपद्वारे नोंदणी करण्याची सुविधा मिळणार आहे.

जाहिरात

MHADA Lottery

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई: तुमच्या स्वप्नातील घर सत्यात उतरवण्याची ही  संधी आहे. म्हाडा रजिस्ट्रेशनचेसाठ  सुरुवात होणार आहे. म्हाडासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया गुरुवारपासून सुरू होणार आहे . तुम्ही अजूनही अर्ज केला नसेल तर तुमच्याकडे काही तास उरले आहेत. तुम्ही आज अर्ज करू शकता. घरांच्या लॉटरी ची प्रक्रिया सोपी करण्यासाठी महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्र विकास प्राधिकरणाने (म्हाडा) पुढाकार घेतला आहे. लॉटरीच्या प्रक्रियेत काही बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे आता अर्ज करणं खूप सोपं झालं आहे. म्हाडाने मोबाइल अॅप तयार केलं आहे. या अॅपच्या माध्यमातून लोकांना घरबसल्या कम्प्युटर किंवा लॅपटॉप तसेच मोबाइलवरून अर्ज करता येणार. म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार लॉटरीत सहभागी होण्यासाठी अर्जदारांना मोबाइल अॅपद्वारे नोंदणी करण्याची सुविधा मिळणार आहे. कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करता येणार आहेत. या लॉटरी प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी अर्जदारांकडे यापूर्वी म्हाडाच्या वेबसाइटचा एकच पर्याय होता, मात्र मोबाइल अॅपच्या निर्मितीमुळे दोन पर्याय उपलब्ध होणार आहेत.

UPI वरून बँक खात्यात चुटकीसरशी कसे ट्रान्सफर करायचे पैसे? वापरा ही सोपी ट्रिक

तुम्ही mhada.gov.in या वेबसाईटवरून अर्ज करू शकता. वेबसाईटवरुन अर्ज करायचा असल्याने अनेक त्रुटी आणि समस्या येत होत्या. मात्र आता तसं होणार नाही. तुम्ही मोबाईलवरून कुठूनही अर्ज करू शकणार आहात. लॅपटॉप किंवा कंम्प्युटर लोकांकडे कमी असतो. मात्र मोबाईलचा वापर जास्त लोक करतात, त्यामुळे अर्ज करणं अधिक सोपं होईल.

इन्शुरन्स खरेदी करणाऱ्या नवीन ग्राहकांना मिळणार इन्सेंटिव्ह, 2023 च्या बजेटकडून ‘या’ आहेत अपेक्षा

संबंधित बातम्या

मुंबईतील घरांची सोडत फेब्रुवारीमध्ये ३,५०० घरांची सोडत काढण्यात येणार आहे. सगळी प्रक्रिया ऑनलाइन असणार आहे. त्यामुळे तुम्हाला ऑनलाइन रजिस्ट्रेशन करणं आवश्यक आहे. याची सगळी माहिती तुम्हाला म्हाडाच्या ऑनलाईन साईटवर देखील मिळू शकते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या