मराठी बातम्या / बातम्या / मनी / Mhada Lottery 2023 : नवरा-बायको दोघांनाही घरं लागलं तर दोन्ही घरं घेता येतात का?

Mhada Lottery 2023 : नवरा-बायको दोघांनाही घरं लागलं तर दोन्ही घरं घेता येतात का?

Mhada Lottery 2023 : म्हाडाचं रजिस्ट्रेशन सुरू झाले असून अंतिम मुदत 5 फेब्रुवारी आहे.

Mhada Lottery 2023 : म्हाडाचं रजिस्ट्रेशन सुरू झाले असून अंतिम मुदत 5 फेब्रुवारी आहे.


मुंबई : तुम्ही आपल्या घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हाडामध्ये अर्ज करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी फार महत्त्वाची आहे. यंदाची ही लॉटरी सिस्टिम खूप वेगळी असणार आहे. यावर्षी अनेक बदलही करण्यात आले आहेत. म्हाडाचं रजिस्ट्रेशन सुरू झाले असून अंतिम मुदत 5 फेब्रुवारी आहे.

यावेळी तुम्हाला रजिस्ट्रेशन करतानाच डॉक्युमेंट जमा करावे लागणार आहेत. 21 ऐवजी 7 कागदपत्रांद्वारे ही लॉटरीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. त्यामुळे यावेळीची लॉटरी खूपच वेगळी असणार आहे. आता प्रश्न असा आहे की नवरा बायको वेगवेगळा अर्ज भरु शकतात का? दोघांनाही घर लागलं तर हे घर दोघांनाही घेता येतं का याबाबतचा नियम काय सांगतो?

म्हाडाच्या लॉटरीसाठी नवरा आणि बायको दोघंही अर्ज करू शकतात. बऱ्याचदा म्हाडाकडून लॉटरी काढताना जर असे अर्ज आले तर त्यापैकी एकालाच लॉटरी लागण्याची शक्यता जास्त असते. दुसरा अर्ज बाद केला जातो.

Mhada lottery 2023 : म्हाडासाठी अर्ज करताना अडचणी येतात? मग तुमच्या प्रश्नाचं इथे मिळेल उत्तर

त्यामुळे तुम्ही बऱ्याचदा पत्नीचं नाव न बदलता तिचे सगळे डॉक्युमेंट जमा केले जातात. लॉटरीमध्ये दोघांनाही घर लागलं तर मग कागदपत्र सादर करताना मॅरेज सर्टिफिकेट सादर करून एक घर घेण्याचा निर्णय घेतला जातो.

पती-पत्नी दोघांनाही घर लागलं तरी तुम्हाला दोन घरं घेता येत नाही. पत्नीला म्हाडा फ्लॅटची सहमालक म्हणून जोडण्याचा पूर्ण अधिकार पत्नीला आहे. पत्नीचा अधिकार महाराष्ट्रातील रहिवाशावर अवलंबून नसतो, तिला पत्नी म्हणून अधिकार आहे. त्यामुळे ती सहमालक म्हणून धरली जाऊ शकते. अशावेळी एक घर सोडावं लागू शकतं.

Mhada Lottery 2023 : म्हाडाचं घर घेण्यासाठी भरावे लागणार दुप्पट पैसे?

जर पत्नीच्या नावे आधीच घर असेल तर मात्र तिला म्हाडासाठी अर्ज करता येणार नाही. म्हाडाच्या नियमानुसार ज्याचं वय 18 वर्षांपेक्षा जास्त आहे. तो महाराष्ट्रातील 20 वर्षांहून अधिक रहिवासी असणं आवश्यक आहे. यासोबत त्याच्या नावावर कोणतंही घर असू नये. या सगळ्या अटींची पूर्तता केली तरच लॉटरीसाठी पात्र धरलं जातं.

First published: January 25, 2023, 11:42 IST
top videos
 • Mumbai News : धारावीत 10 बाय 10 ची खोली; कंपाउंडरचं काम करणारी शिरीन बारावीला पास झाली!
 • Pune News : पॅरालिसिस आणि ब्रेन अटॅक; तरी विशाल खचला नाही, 44 वर्षी झाला बारावी पास!
 • Chhatrapati Sambhaji Nagar News : संभाजीनगरमध्ये वाढले प्लास्टिक सर्जरीचे प्रमाण, पाहा काय आहे कारण Video
 • Beed News : आपली एसटी सगळ्यात भारी, बीडकरांच्या प्रेमाने लालपरीचा नवा रेकॉर्ड Video
 • Wardha News: पंक्चरवाल्याची मुलगी तालुक्यात पहिली, निलूच्या यशाने गावकरी भारावले, Video
 • Tags:Mhada Lottery 2023, Money

  ताज्या बातम्या

  सुपरहिट बॉक्स