अशाप्रकारे तुम्ही तुमच्या सिलेंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे हे तपासू शकता.
नवी दिल्ली, 27 जून: आंतरराष्ट्रीय बाजारात नॅचरल गॅसच्या किमतीत वाढ होत आहे. याचा परिणाम घरगुती गॅसच्या किमतीवरही झाला आहे. सरकार 1 ऑक्टोबर रोजी घरगुती गॅसच्या किमती जारी करणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे LPG गॅसच्या किमतीत 60 टक्के वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. PTI वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, भारतातील सरकारी कंपनी ऑईल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन ONGC ने, यावेळी नॅचरल गॅसच्या किमतीत जवळपास 60 टक्क्यांची वाढ होणार असल्याचं म्हटलं आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात गॅसच्या किंमती वाढल्याने याचा परिणाम तेल कंपन्यांच्या रेवेन्यूवरही होऊ शकतो. सरकारने एलपीजी गॅसवर मिळणारी सब्सिडी काही दिवसांपूर्वी संपुष्ठात आणली होती. त्यानंतर एलपीजीवर मिळणाऱ्या सब्सिडीचं वहनही तेल कंपन्यांना करावं लागत होतं.
सब्सिडी बंद झाल्याने ONGC ला फायदा - ONGC चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सुभाष कुमार यांनी कंपनीच्या वार्षिक आर्थिक परिणामाची माहिती देताना सांगितलं, की जानेवारी ते मार्च 2021 मध्ये तेल कंपनीने 58.05 डॉलर प्रति बॅरलच्या दराने कच्च्या तेलाची विक्री केली आहे. काही दिवसांपूर्वी ग्राहकांना मिळणारी सब्सिडी संपुष्ठात आल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्यानंतरही कंपनीला 6734 कोटी रुपयांचा फायदा झाला आहे.