JOIN US
मराठी बातम्या / मनी / महिन्याच्या पहिल्याच दिवशी खुशखबर! LPG सिलेंडरच्या किमतीत मोठी घट, पाहा नवे दर

महिन्याच्या पहिल्याच दिवशी खुशखबर! LPG सिलेंडरच्या किमतीत मोठी घट, पाहा नवे दर

इंडियन ऑइलने 1 सप्टेंबर रोजी जाहीर केलेल्या किमतींनुसार, राजधानी दिल्लीत 19 किलोचा व्यावसायिक सिलिंडर 91.5 रुपयांनी स्वस्त झाला आहे. आजपासून सिलिंडरसाठी 1885 रुपये मोजावे लागणार आहेत (LPG Cylinder Price)

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 01 सप्टेंबर: महिन्याच्या पहिल्याच दिवशी एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात मोठी घट झाली आहे. दुसरीकडे, पेट्रोल आणि डिझेलचे दर तीन महिन्यांहून अधिक काळ स्थिर आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. यावेळी एलपीजी सिलिंडरचे दर 91.5 रुपयांनी कमी झाले आहेत. इंडियन ऑइलने 1 सप्टेंबर रोजी जाहीर केलेल्या किमतींनुसार, राजधानी दिल्लीत 19 किलोचा व्यावसायिक सिलिंडर 91.5 रुपयांनी स्वस्त झाला आहे. आजपासून सिलिंडरसाठी 1885 रुपये मोजावे लागणार आहेत. पूर्वी हा सिलेंडर 1976.50 रुपयांचा होता. Petrol Diesel Prices : महागाईत दिलासा! ‘या’ शहरात पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात, वाचा आजचे दर सलग पाचव्यांदा व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत घट झाली आहे. मे महिन्यात विक्रमी 2354 रुपयांवर पोहोचलेला 19 किलोचा सिलेंडर आता दिल्लीत 1885 रुपयांवर आला आहे. राजधानी दिल्लीत आता यासाठी 1976.50 ऐवजी 1885 रुपये मोजावे लागणार आहेत. तसेच कोलकात्यात 2095.50 ऐवजी 1995.50 रुपये, मुंबईत 1936.50 ऐवजी 1844 रुपये आणि चेन्नईमध्ये 2141 ऐवजी 2045 रुपये मोजावे लागतील. दिल्लीत 14.2 किलोचा गॅस सिलिंडर 1053 रुपयांना मिळत आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत सलग पाचव्यांदा घसरण झाली आहे. 19 मे 2022 रोजी 2354 रुपयांच्या विक्रमी किमतीवर पोहोचलेल्या गॅस सिलेंडरची किंमत 1 जून रोजी 2219 रुपये होती. महिनाभरानंतर सिलिंडरची किंमत 98 रुपयांनी कमी होऊन ती 2021 रुपये झाली. 6 जुलै रोजी तेल कंपन्यांनी या सिलेंडरची किंमत 2012.50 रुपये केली. 1 ऑगस्टपासून हा सिलेंडर 1976.50 रुपयांना मिळू लागला. आता 1 सप्टेंबरला याची किंमत 1885 झाली. सततच्या घसरणीमुळे महागाईच्या काळात सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. Loan on Life Insurance: तुमचा विमा मिळवून देऊ शकतो स्वस्त लोन; या चार स्टेप्सद्वारे करा अर्ज जनतेला महागाईपासून दिलासा देण्यासाठी सरकारने उज्ज्वला योजनेंतर्गत सिलेंडरमागे 200 रुपये सबसिडी जाहीर केली होती. ही सबसिडी वर्षाला फक्त 12 सिलिंडरपर्यंतच मर्यादित असेल. सरकारच्या या निर्णयाचा 9 कोटींहून अधिक ग्राहकांना फायदा झाला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या