मुंबई 1 सप्टेंबर : एकीकडे महागाईचा भडका उडतो आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती वाढत आहेत. महिन्याच्या सुरुवातीलाच गणपतीरायाच्या आगमनानंतर काहीसा दिलासा इंधन दरवाढीत मिळाला आहे. आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट झाल्याची माहिती मिळाली आहे. सणासुदीला ही भाविकांना दिलासा देणारी बातमीच म्हणावी लागेल. जागतिक बाजारातील घसरणीचा परिणाम आता देशांतर्गत बाजारातील किरकोळ किमतींवरही झाला आहे. सरकारी तेल कंपन्यांनी गुरुवारी सकाळी जारी केलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ दरात बदल करण्यात आले. देशातील चार महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.नोएडा-ग्रेटर नोएडामध्ये पेट्रोल 37 पैशांनी घसरून 96.60 रुपये प्रति लीटर झाले आहे, तर डिझेल 37 पैशांनी स्वस्त होऊन 89.77 रुपये प्रति लिटर झाले आहे. गाझियाबादमध्येही पेट्रोलचा दर 32 पैशांनी घसरून 96.2 वर आला आहे डिझेल 37 पैशांनी आणि 89.77 रुपयांनी स्वस्त झालं आहे. गाझियाबादमध्येही पेट्रोलचा दर 32 पैशांनी घसरून 96.26 आणि डिझेलचा दर 30 पैशांनी घसरून 89.45 रुपये प्रति लिटर करण्यात आला आहे. लखनऊमध्ये आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 2 पैशांनी घसरण झाली. हेही वाचा- पहिल्या तिमाहीत 13.5 टक्क्यांच्या गतीने वाढला भारताचा GDP, पण RBI चा अंदाज चुकला! दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर कोलकात्यात पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर हेही वाचा- Credit Card बिलातील मिनिमम ड्यू अमाऊंटचं गणित समजून घ्या; अन्यथा कर्जाच्या सापळ्यात अडकाल दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलचे दर बदलत असतात. त्यामुळे रोज सकाळी बदललेले दर SMS द्वारे देखील तुम्ही पाहू शकता. तुम्ही एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दर देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9224992249 या क्रमांकावर पाठवून माहिती घेऊ शकतात. BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 या क्रमांकावर पाठवून माहिती मिळवू शकतात. त्याच वेळी, HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड लिहून आणि 9222201122 या क्रमांकावर पाठवू शकता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.