नवी दिल्ली, 12 एप्रिल : केंद्र सरकारकडून देशातील जनतेला जनधन खात्याची (JanDhan Account) सुविधा दिली जाते. जर तुम्हालाही हे खातं सुरू करायचं असेल, तर याद्वारे अनेक सुविधा मिळतात. परंतु जर तुम्ही इन्शोरन्सचा फायदा घेऊ इच्छिता, तर त्यासाठी तुमचं जनधन खातं आधार कार्डशी लिंक (Link to aadhaar) करणं गरजेचं आहे. जर तुमचं खातं आधारशी लिंक नसेल, तर 1.3 लाख रुपयांचं नुकसान होऊ शकतं. या खात्यात ग्राहकांना रुपे डेबिट कार्ड दिलं जातं, ज्यात 1 लाख रुपयांचा दुर्घटना विमा मिळतो, परंतु जर तुम्ही तुमचं खातं आधारशी लिंक केलं नाही, तर तुम्हाला हा फायदा मिळणार नाही. म्हणजेच एक लाखाचं नुकसान होईल. त्याशिवाय या खात्यावर तुम्हाला 30000 रुपयांचा अॅक्सिडेंटल डेथ इन्शोरन्स कव्हर मिळतो. हा कव्हरही बँक खातं आधारशी लिंक असल्यावरच मिळतो. त्यामुळेच जनधन खातं आधार कार्डशी लिंक असणं अतिशय गरजेचं आहे. असं लिंक करा आधार कार्ड - बँकेत जाऊन आधार कार्ड खात्याशी लिंक करू शकता. बँकेत आधार कार्डची एक फोटो कॉपी आणि पासबुक घेऊन जावं लागेल. अनेक बँका आता मेसेजद्वारेही खातं आधारशी लिंक करतात. स्टेट बँक ऑफ इंडियाचे ग्राहक आपल्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरुन मेसेज बॉक्समध्ये UIDआधार नंबरखातं क्रमांक लिहून 567676 या क्रमांकावर मेसेज पाठवू शकतात, त्यानंतर बँक खातं, आधारशी जोडलं जाईल.
महत्त्वाची बाब म्हणजे तुमच्या आधार कार्ड आणि बँकेत दिलेल्या मोबाईल नंबर वेगवेगळा असल्यास आधार लिंक होणार नाही. तसंच जवळच्या एटीएममधूनही बँक खातं आधारशी लिंक केलं जाऊ शकतं. 5000 रुपये काढण्याची सुविधा - पंतप्रधान जनधन अकाउंटवर ग्राहकांना 5000 रुपयांची ओवरड्राफ्ट सुविधा मिळते. ओवरड्राफ्ट सुविधेचा फायदा घेण्यासाठी आधार कार्ड लिंक असणं गरजेचं आहे. या योजनेंतर्गत पंतप्रधान मोदींचा (PMJDY) उद्देश प्रत्येक कुटुंबाचं एक बँक अकाउंट सुरू करणं हा होता. जनधन योजनेमध्ये 10 वर्षाहून लहान मुलाचंही खातं सुरू करता येतं.
या अकाउंटचे फायदे - - 6 महिन्यांनंतर ओवरड्राफ्टची सुविधा - 2 लाख रुपयांपर्यंत अॅक्सिडेंटल इन्शोरन्स कव्हर - 30000 रुपयांपर्यंत लाईफ कव्हर, जो लाभार्थीच्या मृत्यूनंतर योग्य त्या अटी पूर्ण झाल्यास मिळतो. - डिपॉझिटवर व्याज - खात्यासह फ्री मोबाईल बँकिंग सुविधा - जनधन खातेधारकाला रुपे डेबिट कार्ड दिलं जातं. - देशभरात पेसे ट्रान्सफरची सुविधा - सरकारी योजनांच्या फायद्यांचा पैसा थेट खात्यात जमा होतो.
जुनं खातं असं बनवा जनधन खातं - तुमचं एखादं जुनं खातं असल्यास ते जनधन खात्यात बदलता येऊ शकतं. त्यासाठी बँक ब्रांचमध्ये जाऊन रुपे कार्डसाठी अर्ज करावा लागेल आणि एक फॉर्म भरुन तुमचं बँक अकाउंट जनधन योजनेत ट्रान्सफर केलं जाईल.