JOIN US
मराठी बातम्या / मनी / काय सांगता! येथील महिला बनवताय बाजरीचा पिझ्झा अन् केक, पंतप्रधानांनीही केलंय कौतुक

काय सांगता! येथील महिला बनवताय बाजरीचा पिझ्झा अन् केक, पंतप्रधानांनीही केलंय कौतुक

पिझ्झा, बर्गर, केक असं पदार्थ लहान मुलांसह मोठ्या व्यक्तींनाही आवडतात. मात्र तुम्ही कधी बाजरीच्या पिझ्झाविषयी ऐकलेय का? नसेल तर आज आपण त्याविषयी जाणून घेणार आहोत.

जाहिरात

कोटाच्या महिला बनवताय बाजरीचा पिझ्झा

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

कोटा, 20 मार्च : मिलेट्स ईयरदरम्यान कोटामध्ये आता बाजरीपासून वेगवेगळे पदार्थ तयार केले जात आहेत. महिलांना हे पदार्थ बनवण्याचे प्रशिक्षणही दिले जात आहे. असेच एक चार दिवसीय प्रशिक्षण कोटा येथील कृषी विज्ञान केंद्रातही सुरू आहे, या प्रशिक्षणात 25 महिलांच्या गटाला बाजरीचे विविध पदार्थ बनवायला शिकवले जाताय. येथे महिलांना इडली, डोसा, चकली, खिचडी, लाडू, पिझ्झा, केक आदी बनवण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. बाजरीपासून विविध पदार्थ तयार करणाऱ्या महिलांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील कौतुक केले आहे.

रेल्वे स्टेशनवर चहा-कॉफीपासून ते WiFi पर्यंत सर्व काही फ्री हवंय? हे क्रेडिट कार्ड आहेत बेस्ट

पीएम मोदींनीही केलेय कौतुक

कोटा कृषी विज्ञान केंद्र गुंजन सनाढ्य यांनी सांगितले की, भरड धान्यापासून तयार केल्या जाणाऱ्या प्रशिक्षण शिबिरात 25 महिला सहभागी होत आहेत. संध्या यांनी सांगितले की, नुकत्याच झालेल्या अखिल भारतीय श्री ऐन ग्लोबल कॉन्फरन्समध्ये भारतातील 16 कृषी विज्ञान केंद्रांची निवड करण्यात आली होती, त्यापैकी एक कोटा कृषी विद्यापीठ होते. या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोटा कृषी विद्यापीठातील महिला गटाने भरडधान्यांवर बनवलेला पिझ्झा, केक, बिस्किटे लाइव्ह प्रसारणामध्ये पाहिली आणि महिलांच्या कार्याचे कौतुक केले.

53 व्या वर्षी महिलेने सुरु केला बिझनेस, आज कमावते लाखो रुपये!

संबंधित बातम्या

गुंजन सनाढ्य यांनी सांगितले की, कोटा येथील कृषी विज्ञान केंद्रात भरड धान्यासाठी एक कमर्शियल युनिट देखील आहे. येथे महिलांना प्रशिक्षणानंतर स्टार्टअप सुरू करण्याबाबत सांगितले जाते. याशिवाय महिलांना कर्जही उपलब्ध करून दिले जाते. तसंच संध्या म्हणाल्या की, सध्या बचत गटातील महिलांना बाजरी केक आणि बाजरी पिझ्झा बनवण्याचे प्रशिक्षण दिलं जातंय.

आगामी काळात असे आणखी प्रशिक्षण दिले जाणार आहे. हे प्रशिक्षण घेण्यासाठी कोणतीही महिला कृषी विज्ञान केंद्राशी संपर्क साधू शकते. तज्ज्ञांच्या मते, सामान्य धान्यांच्या तुलनेत भरड धान्य लवकर तयार होतं, यासोबतच ते जास्त फायदेशीर देखील आहे. पौष्टिक असण्यासोबतच तुमचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी ते प्रभावी ठरते. सध्याच्या जीवनशैलीत बाजरी वरदानापेक्षा कमी नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या