JOIN US
मराठी बातम्या / मनी / Life Insurance: विमा कव्हर घेताय? या तीन पद्धतींनुसार ठरवा विम्याची योग्य रक्कम किती असावी

Life Insurance: विमा कव्हर घेताय? या तीन पद्धतींनुसार ठरवा विम्याची योग्य रक्कम किती असावी

बरेच जण स्वत:साठी विम्याची योग्य रक्कम किती असावी, हे ठरवू शकत नाही. असं म्हटलं जातं की, वार्षिक उत्पन्नापेक्षा (annual income) कमीत कमी 10 पट जास्त किमतीचा विमा कव्हर घ्यायला पाहिजे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 21 मे : कोरोना (corona) काळात लाईफ इन्शुरन्सचं महत्व आधीच्या तुलनेत खूप वाढलंय. त्यामुळे विम्याबद्दल जनजागृती होताना दिसतेय. शिवाय लोक आपापल्या बजेट मधील विमा पॉलिसीबद्दल माहिती मिळवत आहेत. या महामारीच्या काळात लोक आपल्या आणि कुटुंबातील इतर सदस्यांच्या सुरक्षिततेवर भर देत आहेत. त्यामुळे हेल्थ इन्शुरन्स (health insurance) आणि लाईफ इन्शुरन्सबद्दल लोकांचा इंटरेस्ट वाढला आहे. मात्र अशात बरेच जण स्वत:साठी विम्याची योग्य रक्कम किती असावी, हे ठरवू शकत नाही. असं म्हटलं जातं की, वार्षिक उत्पन्नापेक्षा (annual income) कमीत कमी 10 पट जास्त किमतीचा विमा कव्हर घ्यायला पाहिजे. खाली दिलेल्या तीन पर्यायांच्या मदतीने तुम्ही तुमची विम्याची योग्य रक्कम ठरवू शकता. उत्पन्नाच्या आधारे - आवश्यक कव्हर - सध्याचं वार्षिक उत्पन्न X रिटायरमेंटला उरलेली वर्ष कोणासाठी - सॅलरीड क्लास (नोकरदार वर्ग) उदाहरण - आयटी प्रोफेशनल विशालचे वय 30 वर्षआहे. त्याचे वार्षिक उत्पन्न 10 लाख रुपये आहे आणि त्याच्या रिटायरमेंटला 30वर्ष बाकी आहेत. या हिशोबाने विशालला 3 कोटी रुपये रकमेचा विमा कव्हर घ्यावा लागेल. खर्चाच्या आधारावर- रोजचा खर्च आणि लोनच्या हिशोबाने विमा कव्हरचा अंदाज बांधला जातो. हे करताना महागाईचा विचार करावा लागतो. हा कव्हर ठरवण्याची दुसरी पद्धत आहे. आवश्यक कव्हर - वार्षिकखर्च X पॉलिसीचा कालावधी कोणासाठी - बिझनेस मॅन उदारहण – कार्तिकचा वार्षिक खर्च 6 लाख रुपये आहे. त्याला 30 वर्षांसाठी पॉलिसी घ्यायची आहे, तर त्याला जवळपास 1.80 कोटी रुपयांचा विमा कव्हर घ्यावा लागेल. महागाईमुळे खर्च वाढेल, त्यामुळे विम्याची रक्कम देखील वाढेल.

(वाचा -  1 लाखांचा इन्शुरन्स आणि बरंच काही…; PM जनधन योजनेअंतर्गत बँक खात्याचे फायदे )

‘आयुष्याच्या मोला’च्या आधारे - इन्शुरन्स कव्हर काढण्यासाठी तुम्हाला तुमच्या उत्पन्नातून स्वतःवर होणारे खर्च कमी करावे लागतील, मर्यादित ठेवावे लागतील. हा विमा कव्हर ठरवण्याची तिसरी पद्धत आहे यात तुमच्या आयुष्याचं मूल्य किती याचा अंदाज बांधून यानुसार निर्णय घेता येतो. आवश्यक कव्हर - वार्षिक खर्च - स्वतःवर होणारा खर्च X रिटायरमेंटसाठी शिल्लक असलेला कालावधी कोणासाठी - प्रोफेशनल्स उदाहरण - 30 वर्ष वयाचा जयंत डॉक्टर आहे. त्याचं वार्षिक उत्पन्न 10 लाख रुपये आहे. त्यापैकी 3 लाख रुपये तो स्वतःवर खर्च करतो. म्हणजे त्याची एका वर्षाची इकॉनॉमिक व्हॅल्यू 7 लाख रुपये आहे. त्याचं रिटारयमेंटचं वय 60 वर्ष गृहीत धरल्यास त्याची ह्यूमन लाइफ व्हॅल्यू 2.1 कोटी रुपये असेल. हेच त्याच्या आयुष्याचं मूल्य म्हणता येईल. तुम्ही जर विमा कव्हर घेण्याचा विचार करत असाल, तर वर दिलेल्या तिन्ही पद्धती समजून घ्या. त्यानुसार तुम्ही ज्या गटात मोडता त्याचा अभ्यास करून तुम्ही विमा कव्हर घेऊ शकता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या